Sanjay Shirsat's Son News :ऑफिसला परत आला तर तुझे हातपायच तोडतो, बेट्या... : आमदार शिरसाठांच्या मुलाची केटरिंग व्यावसायिकास धमकी

आमदार संजय शिरसाठ आणि त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्टीतील २० हजार रुपये संबंधित केटरिंग चालकाची आमदारांकडे बाकी होती.
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSarkarnama

औरंगाबाद : वाढदिवसाच्या पार्टीचे बिल मागणाऱ्या केटरिंग व्यवसायिकाला शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांच्या मुलाने (Son) हातपाय तोडण्याची धमकी (threate) दिली आहे. याबाबतची ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आहे. (MLA Sanjay Shirsat's son threatens a catering business man)

आमदार संजय शिरसाठ आणि त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्टीतील २० हजार रुपये संबंधित केटरिंग चालकाची आमदारांकडे बाकी होती. त्यासाठी केटरिंग चालकाने सिद्धांत शिरसाठ यांना फोन केला होता. त्यावेळी सिद्धांत शिरसाठ यांनी बिलासाठी पुन्हा ऑफीसला आला तर हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचे ऑडिओ क्लिपमधून दिसून येत आहे.

Sanjay Shirsat
AjitDada Warned Gogawale : ‘गोगावले, तुम्ही मला जेवढी अडचण निर्माण कराल, तेवढे मंत्रीपद तुमच्यापासून दूर जाईल’

केटरिंग चालक आणि सिद्धांत शिरसाठ यांच्यातील संवाद

सिद्धांत शिरसाठ : बोला

केटरिंग चालक : आमदारसाहेबांसोबत बोलणी झालं त्यावेळी ४० हजार ठरलं होतं. पण बाहेर आल्यावर मला २० हजार रुपयेच दिले आहेत.

सिद्धांत शिरसाठ : साहेबांनी जेवढे सांगितले होते, तेवढेच दिले. विषय संपला आता.

केटरिंग चालक : भाऊ अजून वीस हजार रुपये बाकी आहे ना भाऊ...

सिद्धांत शिरसाठ : मूड खराब करायचा नाही हं आता...

केटरिंग चालक : भाऊ कामाचे पैसे तुमच्याकडे बाकी आहेत, असं नका ना करू. तुमच्या एका शब्दावर तुमचे ७५ हजार रुपये रिटर्न केले.

सिद्धांत शिरसाठ : उपकार केले ना तू.

केटरिंग चालक : भाऊ तशी नका भाषा वापरू. तेवढे कामाचे पैसे देऊन टाका.

सिद्धांत शिरसाठ : कोणत्या कामाचे पैसे....

केटरिंग चालक : त्याच कामाचे. तसे एक लाख २५ हजार रुपये होते. पण तुमच्या शब्दावर ७५ हजार रुपये डिस्काउंट केले.

सिद्धांत शिरसाठ : तू ना आता जरा त्याच्यावर वरच झाला. साहेबांसमोर तुला वीस हजार रुपये दिले.

Sanjay Shirsat
Bhima-Patas Sugar Factory : नेत्यांच्या हातापाय पडलो अन्‌ कारखाना चालू केला, विकला तर नाही ना? : कुल-ताकवणेंमध्ये तू तू-मैं मैं

केटरिंग चालक : साहेबांनी ४० हजार रुपये देण्याचे कबूल केले हेाते. पण बाहेर आल्यावर माझ्या हातावर वीसच हजार रुपये देण्यात आले.

सिद्धांत शिरसाठ : मग, तू का नाही त्यावेळी बोलला.

केटरिंग चालक : बरं, परत यायला लागेल ऑफीसला. मग आता काय करणार...

सिद्धांत शिरसाठ : ऑफीसला परत आला तर तुझे हातपायच तोडतो बेट्या...

केटरिंग चालक : भाऊ असं नका ना बोलू तुम्ही...

सिद्धांत शिरसाठ : असं नका बोलू म्हणजे...

केटरिंग चालक : कामाचे पैसे तेवढे देऊन टाका ना. तुम्हाला घाबरायचे पैसे मागतोय का.

सिद्धांत शिरसाठ : कुणाचं देणं आहे... रे. कुठाय तू आता...

केटरिंग चालक : घरी होतो.

सिद्धांत शिरसाठ : थांब येतो तिथं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com