Cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्ताराचा संजय शिरसाटांनी सांगितला मुहूर्त

Cabinet expansion : मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या आमदारांच्या आशा पल्लवित झाल्या
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSarkarnama

Cabinet expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, असा प्रश्न विचारला जात असतानाच आता शिंदे गटाच्या एका आमदाराने मंत्रिमंडळ विस्ताराबाबत थेट तारीखच सांगितली आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या आमदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शिंदे - फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आलं. त्यानंतर छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तारही झाला. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना संधी मिळाली नाही. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्ताराकडे अनेक आमदारांचे लक्ष लागले होते. असे असतानाच शिंदे गटाच्या एका आमदाराने मंत्रिमंडळ विस्ताराबाबत थेट तारीखच सांगितली आहे.

Sanjay Shirsat
Narayan Rane :...तर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे संजय राऊतांना चपलेने मारतील; राणेंचा गंभीर आरोप

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना मंत्रिमंडळाचा विस्तार नेमकी कधी होणार? याबाबत सांगितलं.

शिरसाट म्हणाले, ''आता मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागणार आहे. 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तर मंत्रिमंडळ विस्तारासाठीच्या तांत्रिक बाबी 15 जानेवारीपर्यंत दूर होतील'', असही यावेळी ते म्हणाले.

Sanjay Shirsat
Abdul Sattar : अधिवेशनात राजीनाम्याची मागणी करणारे दानवे सत्तारांच्या निशाण्यावर...

दरम्यान, शिंदे - फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूरमध्ये झालेल्या अधिवेशनाच्या आधी होणार होता असं सांगितलं जात होतं. मात्र त्यावेळी विस्तार झाला नाही. त्यानंतर १५ जानेवारीपर्यंत विस्तार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. तर आता आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा थेट मुहूर्तच सांगितला आहे. त्यामुळे येत्या 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com