
Aurangbad Political News : हिंगोली येथे उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा झाल्यानंतर विरोधकांकडून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. (Uddhav Thackeary News) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापासून शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील या सभेची खिल्ली उडवली. शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी तर ठाकरेंची सभा म्हणजे टाईमपास होता, अशी टीका केली.
टोमणे, टोले, उपमा देणे आणि यमक जुळवून टाळ्या मिळवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न कालच्या सभेतून दिसून आला. या सभेला लोकांनी गांभीर्याने घेतले नाही, असा दावाही (Sanjay Shirsat) शिरसाट यांनी केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackearay) यांच्या हिंगोलीतील निर्धार सभेला हजारोंची गर्दी जमली होती.
परभणीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणांची तुलना केली, तर ठाकरेंचे भाषण उजवे ठरल्याची देखील चर्चा सर्वत्र होत आहे. (Shivsena) शिंदे गट मात्र हे मानायला तयार नाही. शिरसाट म्हणाले, ठाकरेंची सभा म्हणजे टाईमपास, लोक येतात ऐकतात, टाळ्या वाजवतात आणि निघून जातात. असेच कालच्या सभेतही घडले.
रामदास आठवलेंचा प्रभाव उद्धव ठाकरेंवर झाला की काय? असे आता वाटायला लागले आहे. आठवले जसे कविता करतात, यमक जुळवतात, तसाच काहीसा प्रकार आता ठाकरेंच्या बाबतीत होऊ लागला आहे. त्यामुळे शिंदे गटावर टीका, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आता मोदी, शाह यांच्यावर टीका हेच ठाकरेंच्या भाषणाचे स्वरूप झाले आहे. त्यामुळे आम्ही या सभांना गांभीर्याने घेणे सोडले आहे, असेही शिरसाट म्हणाले.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.