रासपचे आमदार रत्नाकर गुट्टेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

हे राजकीय षडयंत्र असल्याचं रत्नाकर गुट्टे यांनी म्हटलं आहे.
ratnakar gutte
ratnakar guttesarkarnama

परभणी : रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे (ratnakar gutte) हे अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर एका महिलेने मारहाणीचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतजमीनीच्या वादातून हा प्रकार झाल्याचं समजते.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ratnakar gutte
रामदास आठवले पटोलेंना म्हणाले, 'हिंमत असेल तर सत्तेमधून बाहेर पडा'

"आमदार रत्नाकर गुट्टे हे आपल्या 30 ते 35 साथीदारांसोबत आपल्या शेतात आले आणि त्यांनी आपल्याला शिवीगाळ करून, मारहाण केल्याचं संबधीत महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. विनयभंग केल्याचंही या तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

"आपल्यावर झालेल्या आरोपांना इन्कार आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे. 'जी जमीन अस्तित्वात नाही त्यावरून हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं. हे राजकीय षडयंत्र असल्याचं रत्नाकर गुट्टे यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com