बंडखोर आमदारांची धास्ती वाढली : रमेश बोरणारे यांचा खैरेंना फोन! म्हणाले...

चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे माध्यमांशी बोलत असताचा आला फोन
Ramesh Bornare News, Aurangabad Latest Marathi News, Maharashtra Political Crisis
Ramesh Bornare News, Aurangabad Latest Marathi News, Maharashtra Political CrisisSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असलेल्या 46 आमदारांमधील अस्वस्थता वाढत असल्याचे चित्र दिसून आले. यातील एक आमदार रमेश बोरणारे (Ramesh Bornare) यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना फोन करून मध्यस्थी करण्याची विनंती केल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Eknath Shinde Latest news)

बंडखोर आमदार हे मजेत असून ते सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा या गटातर्फे करण्यात येत असला तरी बोरणारे यांच्या फोनमुळे मात्र हा दावा फोल ठरण्याची शक्यता आहे.

Ramesh Bornare News, Aurangabad Latest Marathi News, Maharashtra Political Crisis
मोठी बातमी : शिवसेना एकनाथ शिंदेंची राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करणार?

शिवसेनेचे वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे (Ramesh Bornare) हे मराठवाड्यातील इतर आमदारांप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. चंद्रकांत खैरे हे `एबीपी माझा` शी बोलत असतानाचा बोरणारे यांचा त्यांना फोन आला आणि खैरे यांनी मध्यस्थी करण्याची मागणी त्यांनी केलीय.

त्यावेळी खैरे यांनी बोरणारेंची चौकशी केली. तुम्ही कधी येणार आहात, मी तुम्हाला उद्धवसाहेबांकडे घेऊन जातो, असे खैरेंनी या वेळी सांगितले. खैरे यांनी यात मध्यस्थी करावी,अशी विनंती त्यांनी केली. ती खैरे यांनी मान्य केली. तिकडे काय चाललंय, या खैरे यांच्या प्रश्नावर काहीनाही चहा, नाष्टा, गप्पा असे सुरु असल्याचे बोरणारे यांनी सांगितले. तेव्हा खैरे यांनीही मस्करीच्या सूरात चहा, नाष्टा, रात्री ऑर्केस्ट्रा वगैरे काही सुरु आहे का, असे विचारलं. तेव्हा नाही साहेब असं काही नाही, असं बोरणारे यांनी सांगितलं.

Ramesh Bornare News, Aurangabad Latest Marathi News, Maharashtra Political Crisis
एकनाथ शिंदेंसह ८ बंडखोरांची मंत्रीपदे धोक्यात; तातडीने हकालपट्टीचे संकेत

तुम्ही हॉटेलचं जेवण किती दिवस करणार? पोट बिघडतं. हॉटेलच्या जेवणाने, या खैरे यांच्या सल्ल्यावर बोरणारेही पलीकडून हसले. मी तुम्हाला उद्धव साहेबांकडे घेऊन जातो. कितीजण येणार तुम्ही सांगा, असे खैरे यांनी विचारल्यानंतर सगळ्यांसाठीच मध्यस्ती करा, असे बोरणारे यांनी सुचविले. त्यावेळी सगळ्यांसाठी नाही आता आपल्या जिल्ह्यातील किती आमदार येता ते सांगा, मी करतो मध्यस्ती, असा विश्वास खैरे यांनी त्यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com