Mla Rajesh Tope On Budget : पीककर्ज थकलेल्या शेतकऱ्यांची चोहोबाजूने कोंडी होतेय..

Ncp : क्षेत्र ओलिताखाली येते परंतु तिथे पाणी पोहचत नाही ते क्षेत्र बिगर सिंचन क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात यावे.
Mla Rajesh Tope On Budget News
Mla Rajesh Tope On Budget NewsSarkarnama

Marathwada : राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज थकले आहे, त्यांची खाती राष्ट्रीयीकृत बँकांकडून होल्ड केले जाते. त्यामुळे प्रधानमंत्री किसान खाते, शासकीय अनुदान, विमा खाते होल्ड होऊन जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांना कुठूनही पैसे काढता येत नाही. माझ्या घनसावंगी मतदारसंघात, मराठवाड्यातल्या अनेक जणांनी हा मुद्दा निदर्शनास आणून दिला असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले.

Mla Rajesh Tope On Budget News
High Court News : ग्रामपंचायत स्तरावरील माहिती मिळाली नाही, खंडपीठ आयुक्तांचे रिक्त पद तातडीने भरा..

टोपे म्हणाले, शेतकरी (Faremr) हा आपला कणा आहे त्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अर्थमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचे खाते होल्ड होऊ नये यासाठी भूमिका घ्यावी. समुद्रात जाणारे पाणी मराठवाडा (Marathwada) व तापी नदीकडे वळविण्याची घोषणा सरकारने केली आहे. सध्याच्या अर्थसंकल्पातील निधीची तरतूद पाहता मतदारसंघ बघून निधी दिला जात असल्याचे नमूद करावेसे वाटते.

तसेच जे क्षेत्र ओलिताखाली येते परंतु तिथे पाणी पोहचत नाही ते क्षेत्र बिगर सिंचन क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणीही टोपे यांनी केली. त्याला भरीव निधी उपलब्ध करून देऊन भूसंपादनाचे काम जलदगतीने हाती घ्यावे. जायकवाडी धरण हे मराठवाड्यासाठी वरदान आहे. १०२ टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेल्या या धरणाच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती केली जावी.

यामुळे शेवटपर्यंत पाणी पोहचण्यास मदत होईल. मराठवाडा हा दुष्काळी भाग असून जालना जिल्हा हा कायम अनुशेष असलेला जिल्हा राहिला आहे. त्यामुळे इथल्या प्रकल्पांना निधी देण्यात यावा, अशी मागणी करतांना २०१० या वर्षी मंजूर झालेला हतवण प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in