Mla Prashant Bamb News : आमदार बंब यांनी २३०० गायी कशासाठी खरेदी केल्या ?..

Marathwada : आणखी दीड हजार गायी खरेदी करून त्या शेतकरी, तरुणांना देण्यात येणार आहेत.
Mla Prashant Bamb News
Mla Prashant Bamb News Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) हे नेहमीच चर्चेत असतात. कधी वादग्रस्त मुद्यांमुळे तर कधी त्यांनी राबवलेल्या चांगल्या उपक्रमांमुळे. आता देखील त्यांनी एक उपक्रम हाती घेतला आहे आणि त्या अंतर्गत चक्क २३०० गायी खरेदी केल्या आहेत. आता या गायी कशासाठी? तर मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी.

Mla Prashant Bamb News
Ambadas Danve On Patole : जगतापांनी पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली, मग आम्ही नाही म्हणायचे का ?..

सध्या बेरोजगारीचा प्रश्न संपुर्ण देशाला भेडसावत आहे. त्यात किमान आपल्या मतदारसंघातील तरुणांची बेरोजगारी कशी हटवता येईल, याचा विचार करत आमदार बंब यांनी हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. (Bjp) मतदारसंघातील गरजू तरुणांना प्रत्येकी २ जर्सी गायी घेऊन देत बंब यांनी या तरुणांना दुग्ध व्यवसायाकडे वळवले आहे. (Marathwada) या माध्यमातून या तरुणांना दरमहा २० हजाराहून अधिकची कमाई होत असल्याचे सांगितले जाते.

गीता बन या नावाखाली हा प्रकल्प बंब यांनी मतदारसंघात हाती घेतला आहे. ज्यामध्ये एका शेतकऱ्याला ८० ते ९० हजार रुपये किमंतीच्या दोन गायी देण्यात आल्या आहेत. (Maharashtra) यातून एका गायीकडून दररोज १८ ते २० लिटर एवढे दूध मिळत आहे. दोन गायींचे मिळून चाळीस लिटरपेक्षा जास्त दूध मिळत असल्याने ते थेट अमूल डेअरीला २७ रुपये लिटरप्रमाणे विकले जाते. यासाठी अमुलशी करार करण्यात आला आहे.

दररोज साधरणतः सहाशे-सातशे रुपयांचा खर्च वजा करता संबंधित शेतकऱ्याला महिन्याला २० ते २१ हजारांचे उत्पन्न मिळत आहे. यातून दर महिन्याला १० हजार रुपये बँकेत जमा केले जातात. दीड वर्षानंतर गायीची खरेदी किमंत वसुल झाली की ती गाय त्या शेतकऱ्याच्या मालकीचे होते. अशा प्रकारे दुग्ध व्यवसाय, त्यातून रोजगार, उत्पन्न आणि दिड वर्षात गाय देखील शेतकऱ्याच्या मालकीची होवून जाते. बंब यांच्या या उपक्रमाला मतदारसंघात मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आणखी दीड हजार गायी खरेदी करून त्या शेतकरी, तरुणांना देण्यात येणार आहेत.

मतदारसंघातील साडेसातशे तरुणांच्या हाताला या उपक्रमातून काम देण्यात येणार असल्याचे बंब सांगतात. विशेष म्हणजे हा उपक्रम राबवतांना बंब यांनी काही अटींचे पालन करणे शेतकरी व संबंधित व्यवसाय करणाऱ्या तरुणांना बंधनकारक केले आहे. ज्यात प्रामुख्याने लाभार्थी दुधाच्या व्यवसायात नसावा, त्याला १ एकर शेती असावी, वासराला दररोज ३ लिटर दूध पाजावे, शेतकऱ्यांच्या मुलांनाही मुबलक दूध द्यावे, आणलेल्या गायींचे वय २ ते ४ वर्षे आहे. त्या सरासरी १० वर्षे दूध देतील. त्यानंतर भाकड गायी गोशाळेत पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com