Kshirsagar News : क्षीरसागर काका-पुतण्याच्या लढाईत आमदार सोळकेंची पुतण्याला खंबीर साथ!

संदीप क्षीरसागर यांना साथ देत आमदार प्रकाश सोळंके यांनी केली जयदत्त क्षीरसागर यांची कोंडी
Prakash Solanke, Sandeep Kshirsagar, Jaydatta Kshirsagar
Prakash Solanke, Sandeep Kshirsagar, Jaydatta KshirsagarSarkarnama

बीड : सहा वर्षांपूर्वी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) व आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्यात राजकीय मुद्द्यांवरुन सुरु झालेली लढाई आत संस्थांपर्यंत आली आहे. विशेष म्हणजे यात माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेदेखील (mla Prakash Solanke) संदीप क्षीरसागर यांची खंबीर साथ देत आहेत. (MLA Prakash Solanke supports nephew's fight against Kshirsagar uncle)

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या अधिपत्याखालील आदर्श शिक्षण संस्था, नवगण शिक्षण संस्था, विनायक शिक्षण संस्था व आनंद कृषी प्रतिष्ठानबाबत आमदार संदीप क्षीरसागर यांनी यापूर्वीच जिल्हा परिषदेकडे तक्रारी करुन त्याचा थेट विधानसभा उपाध्यक्षांपर्यंत पाठपुरावा केला. मात्र, आमदार क्षीरसागर यांनी मागितलेली परिपूर्ण माहिती, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्यांना अद्याप दिली नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

Prakash Solanke, Sandeep Kshirsagar, Jaydatta Kshirsagar
Winter Session : पुण्याला पिंपरी-चिंचवड ठरले भारी : महेश लांडगे, सुनील शेळकेंची जोरदार बॅटिंग!

आमदार संदीप क्षीरसागर यांनी या विषयावर विधिमंडळात लक्षवेधी मांडली. त्यावर गुरुवारी (ता. २९ डिसेंबर) झालेल्या चर्चेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. उत्तरानंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी या संस्थांमधील कारभाराचे विशेष लेखा परीक्षण करणार का, असा सवाल करत एखाद्या लोकप्रतिनिधीने माहिती मागितल्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर लोकप्रतिनिधींचा अपमान करणारे असल्याचे सांगितले.

Prakash Solanke, Sandeep Kshirsagar, Jaydatta Kshirsagar
Mangalveda News : मंगळवेढ्याचा समविचारी गट भाजपत जाणार की प्रशांत परिचारकांनाच राष्ट्रवादीत आणणार?

या संस्थांमध्ये अनियमितता असल्याचा आमदार क्षीरसागर यांचा आरोप आहे. विद्यार्थी नावासाहित आधार कार्ड लिंक असलेले, नसलेले व दुबार नावे असल्याबाबत आठ पत्र देऊनही पूर्ण भेटू शकली नाहीत, असे संदीप क्षीरसागर म्हणाले.

Prakash Solanke, Sandeep Kshirsagar, Jaydatta Kshirsagar
Sanjay Shirsat's Son News :ऑफिसला परत आला तर तुझे हातपायच तोडतो, बेट्या... : आमदार शिरसाठांच्या मुलाची केटरिंग व्यावसायिकास धमकी

शालेय पोषण आहारच्या बाबतीत या संस्थांमधील माहितीसाठी नऊ पत्र दिल्याचे संदीप क्षीरसागर म्हणाले. संदीप क्षीरसागर यांच्या लक्षवेधीतील चर्चेत आमदार प्रकाश सोळंके यांनीही सहभाग घेत विशेष लेखा परीक्षण करणार का, कारवाई करणार का, अशी विचारणा सभागृहात केली. एकूणच आमदार क्षीरसागर यांच्या काकांविरुद्धच्या लढाईत आमदार प्रकाश सोळंकेदेखील त्यांच्या साथीला खंबीर असल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in