Prakash Solanke News : मनोज जरांगेंवर टिप्पणी; प्रकाश सोळंके आणि आंदोलकाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Maratha Reservation : या ऑडिओ क्लिपमुळे प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर संतप्त आंदोलकांनी दगडफेक केली
Prakash Solanke News :
Prakash Solanke News :Sarkarnama

Beed Politics : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल टिप्पणी करणे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. जरांगेंना हिणवल्याने संतापलेल्या आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर आंदोलकांनी दगडफेक करत तोडफोड केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या वाहनांचीही तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे माजलगावमध्ये वातावरण चांगलेच तापले असताना, संबंधित मराठा आंदोलकाचा आणि प्रकाश सोळंके यांच्यातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओतील संभाषणात सोळुंके यांनी जरांगेंवर टिप्पणी केल्यानेच आंदोलक संतप्त झाले, तीच ऑडिओ क्लिप समोर आली आहे. मात्र, 'सरकारनामा' या क्लिपची पुष्टी करत नाही.

Prakash Solanke News :
Prakash Solanke : मराठा आंदोलनाला हिंसक वळण: राष्ट्रवादीचे आमदार सोळंकेंच्या बंगल्यावर दगडफेक, गाडी जाळली..

- काय आहे व्हायरल ऑडिओ क्लिप ?

व्हायरल झालेल्या संभाषणानुसार, एका आंदोलकाने प्रकाश सोळंके यांना फोन केला.'सरकारने आरक्षणासाठी तीस दिवसांची मुदत मागितली होती, पण ४० दिवस होऊनही आरक्षण मिळाले नाही.आंदोलकांच्या या वक्तव्यावर, ‘मागणे-देणे हा पोरखेळ झालाय, काही अर्थय का त्याला’ अशी प्रतिक्रिया आमदार सोळंके यांनी दिली. त्यावर संबंधित आंदोलक म्हणाला, आपण दहा दिवस बोनस दिले होते, तर ‘बोनस देणाराही महाहुशार माणूस, बोनस द्यायचे म्हणजे, कधी ग्रामपंचायतची निवडणूक लढविली नाही, पण आता हा सगळ्यात हुशार माणूस झालाय" असे आमदार सोळंके म्हणाले. हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने संतापलेल्या आंदोलकांनी आमदार सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक केली. यामुळे सध्या माजलगावमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या दगडफेकीच्या घटनेवर बोलताना, दगडफेकीची घटना म्हणजे राजकीय विरोधकांनी साधलेली संधी आहे, पण काहीही झाले तरी मी पण मराठा आमदार असून, माझाही या आरक्षणाला पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया सोळुंके यांनी दिली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Prakash Solanke News :
Rathod And Gawali News : संजय राठोड आणि भावना गवळींमध्ये युद्धविराम नाहीच, आज पुन्हा एकमेकांना टाळले !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com