Mla Pradnya Satav News : माझ्यावर झालेला हल्ला पुर्वनियोजित, सखोल चौकशीचे आदेश द्या..

Marathwada : हल्ला करणारा व्यक्ती त्या दिवशी दोन तासापासून मला शोधत होता.
Mla Pradnya Satav News
Mla Pradnya Satav News Sarkarnama

Vidhan Parishad : आज जागतिक महिलादिन (Womens Day) आहे, महाराष्ट्रातील महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने पडतो. काही दिवसांपुर्वी माझ्यावर मतदारसंघात हल्ला झाला, त्याचा अहवाल पोलिसांनी नुकताच दिला. त्यात हा हल्ला दारुच्या नशेत करण्यात आल्याचे म्हटले आहे. हा अहवाल चुकीचा असून माझ्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित होता, त्यामुळे या हल्ल्याच्या सखोल चौकशीचे आदेश गृहमंत्र्यांनी द्यावेत, अशी मागणी काॅंग्रेसच्या आमदार प्रज्ञा सावंत यांनी सभागृहात केली.

Mla Pradnya Satav News
Shashikant Shinde News : उमा खापरेंना मंत्री करा, शिंदेंच्या मागणीने भाजपची कोंडी..

महिला धोरणावरील प्रस्तावावर चर्चा करतांना सातव (Pradnya Satav) यांनी ही मागणी केली. माझ्यासारखी महिलाच जर सुरक्षित नसेल तर मग सामान्य महिलांचे काय? असा प्रश्न देखील सातव यांनी उपस्थितीत केला. सातव म्हणाल्या, मुली, स्त्रियांना समाजामध्ये समान संधी मिळाली पाहिजे. त्यांच्या हक्कांविषयी देखील जनजागृती करणे गरजेचे आहे. (Marathwada) आज महिलादिन आहे, पण खरंच महिला सुरक्षित आहेत का? महाराष्ट्रात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराची दखल गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

माझ्यावर मतदारसंघात जो हल्ला झाला, त्या संदर्भातील चौकशी अहवाल नुकताच पोलिसांनी सादर केला. त्यात हा हल्ला संबंधित व्यक्तीने दारुच्या नशेत केला, त्यामागे इतर कुठलाही उद्देश किंवा राजकीय हस्तक्षेप नव्हता असे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे. हल्ला करणारा व्यक्ती त्या दिवशी दोन तासापासून मला शोधत होता.

गाडीजवळ आल्यावर देखील त्यांनी मॅडम तुम्हीच आहात का? असे त्याने मला विचारले होते. याचाच अर्थ त्याला हल्ला फक्त माझ्यावरच करायचा हे सांगून पाठवण्यात आले होते. झालेला हल्ला हा ठरवून आणि पुर्वनियोजित होता. सरकारने याची गांभीर्याने दखल घेवून पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश द्यावेत.

आज आमच्यामध्ये असुरक्षिततेची भावना आहे, माझ्यावर संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. माझ्या सारखी महिला सुरक्षित नसेल तर मग सामान्य महिलांचे काय? असा सवालही सातव यांनी सभागृहात उपस्थितीत केला. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महिला धोरणात कठोर कायदे आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात विशेष लक्ष दिले जावे, असेही त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in