Mla Meghna Bordikars Holi : मेघना बोर्डीकरांनी साजरा केला बंजारा समाजासोबत होलीकोत्सव..

Bjp : बंजारा भगिनींसमवेत 'होलीकोत्सव' साजरा करण्याचा आनंद काही औरच!
Mla Meghna Bordikar Holi, News
Mla Meghna Bordikar Holi, NewsSarkarnama

Marathwada : राज्यभरात होलिकोत्सवाचा उत्साह सुरू आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच राजकीय नेते, आमदार, खासदार हे देखील होळीच्या सणात उत्साहाने सहभागी होत असतात. बंजारा समाजामध्ये पांरपारिक पद्धतीने होलिकोत्सव साजरा केला जातो. जिंतूरच्या (Bjp) भाजप आमदार मेघना बोर्डीकर या आज बंजारा समाजाच्या होलिकोत्सवात पारंपारिक वेषभूषा करत सहभागी झाल्या.

Mla Meghna Bordikar Holi, News
Mp Sanjay Jadhav News : सात जन्मही मी या पक्षाचे उपकार फेडू शकणार नाही..

बंजारा भगिनींसमवेत 'होलीकोत्सव' साजरा करण्याचा आनंद काही औरच! (Marathwada) समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभलेला हा समाज शतकानुशतके देशाच्या कला आणि वेशभूषेच्या क्षेत्रात भर घालत आला आहे. (Meghna Bordikar) त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांनी त्यांच्या या आनंदोत्सवात सहभागी होण्याचा केलेला आग्रह मोडता आला नाही.

बंजारा समाजाला एक वैभवशाली सांस्कृतिक इतिहास लाभला आहे. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या या समाजाने आपली लोकसंस्कृती कायम जपली आहे. लेंगी नृत्य आणि त्यातील वेशभूषा सुंदर आहे. त्याला एक रेखीव बाज आहे.

महिलांचे त्या समाजातील महत्व आणि स्थान यातून आपल्याला दिसते. समाजातील संस्कृती आपल्याला जपायची आहे. मी परिधान केलेला हा बंजारा पारंपरिक लेहंगा माझे सहकारी बंधू विकास जाधव-अंबरवाडीकर यांनी हांडी (वझर) येथे बनवला आणि मला भेट दिल्याचे बोर्डीकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in