Mla Meghna Bordikar News : आजी-माजी आमदारांमध्ये फेसबुकवर जुंपली...

Bjp-Ncp : २०१४ मध्ये भांबळे यांनी रामप्रसाद बोर्डीकर यांचा पराभव करत विजय मिळवला होता.
Mla Meghna Bordikar-Bhamble news Parbhani
Mla Meghna Bordikar-Bhamble news ParbhaniSarkarnama

Parbhani : जिंतुरच्या विद्यमान भाजप आमदार मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आता पुन्हा या दोघांमध्ये सोशल मिडिया वाॅर सुरू झाले आहे. एका कार्यक्रमात विजय भांबळे यांनी मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांचा फेसबुक आमदार असा उल्लेख केला.

Mla Meghna Bordikar-Bhamble news Parbhani
Protest Against Name Change News : इम्तियाज यांची भिती खरी ठरली, आंदोलनाचा मंडप ओस पडला..

यावर संतापलेल्या बोर्डीकरांनीही जशासतसे प्रत्युत्तर देत भांबळे यांचा उल्लेख फेसबुकवरील पिंट्या असा केला. (Ncp) आता यानंतर दोघांचे समर्थक सोशल मिडियावर एकमेकांवर तुटून पडल्याचे चित्र आहे. जिंतूर- सेलू विधानसभा मतदारसंघात विजय भांबळे आणि बोर्डीकर कुटुंबीयांमधील वाद खूप जुन्हा आहे.

जिंतूर मतदारसंघात आमदार राहिलेले रामप्रसाद बोर्डीकर आणि माजी आमदार विजय भांबळे यांच्यात सातत्याने कुठल्या न कुठल्या कारणावरून वाद होत असतात. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या विरोधात सलग तीनदा भांबळे यांनी निवडणूक लढवली. त्यात दोन वेळा बोर्डीकर यांनी भांबळे यांचा पराभव केला. मात्र २०१४ मध्ये भांबळे यांनी रामप्रसाद बोर्डीकर यांचा पराभव करत विजय मिळवला होता.

गेल्या म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत बोर्डीकर यांच्या कन्या मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी निवडणुक लढवली आणि भांबळेचा पराभव केला. त्यामुळे या दोन नेत्यांमधील वाद पुढेही सुरूच राहिला. अनेकदा दोघांचे समर्थक एकमेकांना भिडल्यामुळे वातावरण तापल्याचे पहायला मिळाले.

सोसायटी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकांत या दोन्ही गटात हमखास राडा होतो. दीड वर्षात होवू घातलेल्या विधानसभा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता पुन्हा हे दोन नेते आणि त्यांचे समर्थक आमने-सामने आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com