आमदार कुचेंच्या कारला दुचाकीची धडक; दोघा जणांची प्रकृती चिंताजनक

MLA Narayan Kuche|Accident : या दुर्घटनेत दुचाकीवरील चौघे जण गंभीर जखमी झाले असून यातील दोघा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
BJP MLA Narayan Kuche Accident News
BJP MLA Narayan Kuche Accident NewsSarkarnama

पाचोड : बदनापूरचे आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांच्या कारला धडकून दुचाकीवरील चौघे जण जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर महामार्गावरील डोणगाव फाट्याजवळ शुक्रवारी (ता. २२ जुलै) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे.

या दुर्घटनेत दुचाकीवरील चौघे जण गंभीर जखमी झाले असून यातील दोघा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील (Accident) उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आले आहे. (BJP MLA Narayan Kuche Accident News)

BJP MLA Narayan Kuche Accident News
इंदूर- अमळनेर बस अपघात : मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर

आमदार कुचे हे औरंगाबादहून वडीगोद्रीकडे जात होते. काही कारणास्तव त्यांनी डोणगाव फाट्यावर रस्त्याच्या कडेला कार थांबवली होती. त्यावेळी औरंगाबादकडून येणारी दुचाकी या कारला धडकली. त्यात दुचाकीवरील राजू राठोड (वय ३५), रोहित राजू राठोड ( वय ११), रोहन राजू राठोड (वय ८) , सविता राजू राठोड (२८, सर्व, रा. बारसवाडा, ता.अंबड) हे जखमी झाले. त्यातील दोघे गंभीर आहेत. धडकेत दुचाकीचा चुराडा झाला. कारचेही नुकसान झाले असून आमदार कुचे यांनी जखमींना उपचारासाठी पाचोड येथील रुग्णालयात दाखल केले. तेथील प्राथमिक उपचारानंतर त्यांना औरंगाबादेतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

BJP MLA Narayan Kuche Accident News
शिंदेंना नमस्कार करताच बंडखोरीची चर्चा.... वैतागलेले खोतकर म्हणाले...

दरम्यान, आमदार कुचे यांच्या वाहनाला पाच वर्षापूर्वी देखील अपघात झाला होता. त्यावेळी स्कॉर्पिओचे टायर फुटून एका शाळेच्या वाहनाला धडक बसली होती. या अपघातात कुचेंना यांचेच्या डोक्याला आणि मानेला मार लागला होता. आता पाचवर्षानंतर पुन्हा एकदा त्यांच्या कारचा अपघात झाल्याने त्या अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in