फाटलेल्या कपड्यावर तुम्ही सायकलवरून फिरत होता...शरम वाटली पाहिजे तुम्हाला : गोरंट्यालांचा खोतकरांवर हल्लाबोल

माझा जालना मतदारसंघ जो आहे. त्यात शहरात आम्ही फार ‘स्ट्राँग’ आहोत. ग्रामीण भागात आम्ही पूर्वी ‘विक’ होतो.
MLA Kailas Gorantyal-Arjun Khotkar
MLA Kailas Gorantyal-Arjun KhotkarSarkarnama

जालना : तुम्ही फाटलेली कपडे घालून सायकलवरून फिरत होता. तुम्ही आज ज्या ठिकाणी पोचलात, ते फक्त उद्धव ठाकरे यांच्या घराण्यामुळे, हे लक्षात ठेवा. पण, त्यांनाच धोका देऊन तुम्ही पार्टी सोडून जाता? तुम्हाला शरम, लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत जालन्याचे काँग्रेसचे (Congress) आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी माजी आमदार अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर हल्लाबोल केला. (MLA Kailas Gorantyal criticizes former minister Arjun Khotkar)

आमदार गोरंट्याल म्हणाले की, तुम्ही स्वार्थासाठी शिवसेना पक्ष सोडून गेलेले आहात. तुम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे; म्हणूनच तुम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. तुम्ही काय होता, ठाकरे परिवारामुळे तुमचं अख्खं आयुष्य बदललं, त्यांच्यामुळे तुम्ही मोठे झालात. फाटलेल्या कपड्यावर तुम्ही सायकलवर फिरत होता. आज तुम्ही ज्या ठिकाणी पोचलात, ते फक्त उद्धव ठाकरे यांच्या घराण्यामुळे हे लक्षात ठेवा. आज त्यांना धोका देऊन तुम्ही पार्टी सोडून जाता? तुम्हाला शरम, लाज वाटली पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी कुठेही जाणार? उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तर पाया पडून परत येणार, असं आहे का तुमच्याकडे?

MLA Kailas Gorantyal-Arjun Khotkar
भाजपची ताकद; राणेंचा बूस्टर डोस...तरीही शिवसेनेने जिंकली दोन माजी सभापतींची गावे!

माझा जालना मतदारसंघ जो आहे. त्यात शहरात आम्ही फार ‘स्ट्राँग’ आहोत. ग्रामीण भागात आम्ही पूर्वी ‘विक’ होतो. पण, मात्र ग्रामीण भागातून आम्हाला भास्कर आंबेकर, श्री. शेजवल, हरिभाऊ शिंदे यांच्यासारखे खंबीर लोक भेटले आहेत, त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला मोठे यश मिळाले. ज्या ठिकाणी आम्ही मायनस होतो, त्या ठिकाणी आम्ही आता सरप्लस होणार आहोत, असेही गोरंट्याल यांनी सांगितले.

MLA Kailas Gorantyal-Arjun Khotkar
‘अजितदादा, तुमची वेळ चुकली...तो शपथविधी दुपारी झाला असता तर तुम्ही आज मुख्यमंत्री असता’ : भाजप आमदाराने फोडले गुपीत

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि बाजार समितीच्या निवडणुकीत तुम्हाला आमची ताकद दिसेल, असा विश्वासही आमदार कैलास गोरंट्याल यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला. माजी मंत्री अर्जून खोतकर हे शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत, त्याबाबत त्यांचे विरोधक गोरंट्याल यांनी खोतकर यांचा समाचार घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com