Lasur Market Committee News : कारखाना हातून गेल्यानंतर आमदार बंब यांची प्रतिष्ठा पुन्हा पणाला..

Marathwada : बंब यांना बाजार समितीमध्ये शिरकाव करू द्यायचा नाही, असे प्रयत्न डोणगांवकर, संतोष माने यांनी सुरू केले आहेत.
Lasur Market Committee News
Lasur Market Committee NewsSarkarnama

Bjp : गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काही महिन्यांपुर्वी भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला होता. हा कारखाना ताब्यातून गेल्यामुळे बंब यांना मोठा धक्का बसला होता. आता त्यानंतर लासूरसह मतदारसंघातील इतर बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने बंब यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली आहे.

Lasur Market Committee News
Chandrakant Khaire On Bhumre : थोडं थांबा, भुमरे फक्त आठ दिवसांचे पालकमंत्री ; मग त्यांच्या मागे ईडी लागेल..

आमदार बंब यांच्या स्वतःच्या गावातील लासूर बाजार समितीसह मतदासंघातील गंगापूरसाठी जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत या बाजार समित्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. (Shivsena) दोन्ही बाजूंनी जोरात प्रचाराला सुरूवात झाली आहे. बंब यांच्या पॅनल विरोधात पुन्हा एकदा ठाकरे गटाचे व गंगापूर साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन कृष्णापाटील डोणगावकर हे दंड थोपटून मैदानात उतरले आहेत.

तर गंगापूर बाजार समितीमध्ये (Ncp) राष्ट्रवादीचे संतोष माने विरुद्ध बंब असा सामना रंगण्याची शक्यता आहे. गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रशांत बंब यांचे संपुर्ण पॅनल पराभूत झाले होते. कृष्णा पाटील डोणगांवकर यांच्या नेतृत्वाखालील शिवशाही पॅनलने बंब यांच्या पॅनलचा पराभव केला होता. स्वतः बंब यांचा देखील लासूरमधून पराभव झाला होता. कारखान्यातील सत्ता गेल्यामुळे बंब यांच्यासाठी हा मोठा धक्का होता.

मात्र हा पराभव विसरत बंब यांनी लासूर, गंगापूर बाजार समिती निवडणुकीत पुन्हा जोर लावला आहे. प्रचारात देखील बंब यांनी आघाडी घेतली आहे, कुठल्याही परिस्थितीत दोन्ही बाजार समित्या ताब्यात घेण्याचा आणि कारखान्याच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा डाग पुसण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बंब यांना बाजार समितीमध्ये शिरकाव करू द्यायचा नाही, असे प्रयत्न ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगांवकर, राष्ट्रवादीचे संतोष माने यांनी सुरू केले आहेत.

पत नसलेल्या खुल्ताबाद बाजार समितीचे लासूरच्या बाजार समितीमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता. पंरतु निवडणूक कार्यक्रम आधीच जाहीर झाल्यामुळे आता नेमकी या बाजार समितीची निवडणुक होणार की नाही? याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. तर खुल्ताबाद बाजार समितीचे लासूरमध्ये विलीनीकरण करणे अन्यायकारक असल्याचे सांगत डोणगांवकर यांनी यास विरोध दर्शवला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com