Vaijapur APMC Chairman Election : आमदार बोरनारे परीक्षेत पास ; सत्ता अन् सभापती-उपसभपतीही निवडून आणले..

Shivsena : बोरनारे-परदेशी जोडीने बाजार समितीची सत्ता मिळवत विरोधकांना चारीमुंड्या चीत केले होते.
Vaijapur Market Committee News
Vaijapur Market Committee NewsSarkarnama

Mla Ramesh Bornare : राज्यात झालेले सत्तांतर, विरोधकांकडून सातत्याने गद्दार म्हणून होणारी टीका आणि पहिलीच बाजार समितीची निवडणूक. (Vaijapur APMC Chairman Election) वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्यासाठी ही परिक्षाच होती. परंतु वैजापूरमधून पहिल्यांदाच आमदार झालेल्या बोरनारे यांनी बाजार समितीची परिक्षाही पास केली. सत्ताही मिळवली आणि सभापती, उपसभापतीही निवडून आणले. बोरनारे यांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली होती.

Vaijapur Market Committee News
Lasur Station APMC Election : बंब यांचे मिशन फत्ते ; सभापती, उपसभापती बिनविरोध..

पण त्यांनी विरोधकांकडून कितीही टीका केली जात असली तरी मतदारसंघातील लोक आपल्यासोबत असल्याचे या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून दिले. (APMC Election) बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) भाजप युतीचे उमेदवार रामहरी कारभारी जाधव हे सभापतीपदी तर उपसभापतीपदी शिवकन्या मधुकर पवार यांची निवड झाली.

त्यांनी अकरा मते मिळवुन त्यांचे प्रतिस्पर्धी ज्ञानेश्वर जगताप व प्रशांत सदाफळ यांचा चार मतांनी पराभव केला. (Ramesh Bornare) आमदार बोरनारे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.‌दिनेश परदेशी व आप्पासाहेब पाटील यांच्या पॅनलच्या सर्वच्या सर्व म्हणजे अकरा उमेदवारांनी एकजुट दाखवत बाजार समितीवर युतीचा झेंडा फडकवला. (Bjp) ‌निवडणुक निर्णय अधिकारी विनय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी बारा वाजता विशेष सभा घेण्यात आली.

यावेळी सभापतीपदासाठी युतीकडुन रामहरी जाधव व आघाडीतर्फे ज्ञानेश्वर जगताप यांनी अर्ज भरले. तर उपसभापती पदासाठी युतीकडुन शिवकन्या पवार व प्रतिस्पर्धी गटाकडुन प्रशांत सदाफळ यांनी अर्ज दाखल केले. गुप्त मतदान घेतल्यानंतर निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केला.

बाजार समितीची निवडणूक शिंदे गटाचे आमदार बोरनारे आणि भाजपचे दिनेश परदेशी यांनी एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला. पण भाजपमध्ये दोन गट पडले आणि मोजके स्थानिक नेते, पदाधिकारी सोडले तर बहुतांश भाजप महाविकास आघाडीसोबत होती. अशा परिस्थितीत बोरनारे-परदेशी जोडीने बाजार समितीची सत्ता मिळवत विरोधकांना चारीमुंड्या चीत केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com