MLA Bangar came to the wedding and started slogan : बांगर लग्नात आले अन् सुरु झाल्या `पन्नास खोके एकदम ओक्के` च्या घोषणा..

Shivsena : संतोष बांगर खासदार संजय जाधव समोरासमोर आले तेव्हा बांगर जाधव यांच्या पाया पडले, हस्तांदोलनही केले.
MLA Santosh Bangar News, Parbhani
MLA Santosh Bangar News, ParbhaniSarkarnama

Parbhani News : विरोधकांच्या `पन्नास खोके एकदम ओके` च्या घोषणांनी सत्तेतील शिंदे गटाला सळो की पळो करून सोडले आहे. (MLA Bangar came to the wedding and started slogan) संधी मिळेल तेव्हा ठाकरे गटातील कार्यकर्ते शिंदे गटाच्या आमदार, खासदार, कार्यकर्त्यांना डिवचत असतात. आता तर हे लोण चक्क लग्न समारंभापर्यंत देखील पोहचले आहे.

MLA Santosh Bangar News, Parbhani
Ambadas Danve Demand enquiry : भुमरेंच्या खात्याकडून करण्यात आलेल्या टॅब खरेदीत घोटाळा, चौकशी करा..

त्याचे झाले असे की, तालुक्यातील देवेगाव येथे सोमवारी (ता. २९) झालेल्या एका लग्न सोहळ्याला कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी हजेरी लावली. लग्न मंडपात बांगर यांचे आगमन होताच तिथे उपस्थितीत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी `पन्नास खोके एकदम ओके`, च्या घोषणा दिल्या. (Shivsena) त्यामुळे लग्नातील सनईच्या सुरांचे रुपांतर राजकीय सुरांमध्ये झाले.

राज्यातील सत्ता परिवर्तनात शिवसेनेत उभी फूट पडल्याने असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच भाजप सोबत युती केलेल्या शिंदे गटातील लोकप्रतिनिधींना या असंतोषाचा नेहमी सामना करावा लागतो. (Parbhani) शेजारील नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकार आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटात सहभागी झाल्यावर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हेही अतिशय नाट्यमयरीत्या त्यांच्यासोबत गेले.

हिंगोली व नांदेड हे दोन्ही जिल्हे परभणीचे शेजारी असल्याने साहजिकच परभणीच्या आमदार, खासदारांकडे लक्ष लागले होते. परभणी हा सेनेचा बालेकिल्ला असून, येथील दोन्हीही लोकप्रतिनिधी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी कायम आहेत. पाथरी तालुक्यातील देवेगाव येथील एका लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव व शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे समोरासमोर आले होते.

यावेळी बांगर यांनी जाधव यांचे चरणस्पर्श करून हस्तांदोलन केले. त्यामुळे सुरुवातीला अनेकांच्या भुवया उंचावल्या. खासदार जाधव यांनीही त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद दिला, त्यानंतर ते निघून गेले. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मात्र संधी मिळताच `पन्नास खोके एकदम ओके`चा घोष केला. त्यामुळे लग्न सोहळ्याला राजकीय आखाड्याचे स्वरूप आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com