पक्षांतर्गत गटबाजीला वैतागून बाबाजानी दुर्राणी यांचा राजीनामा!

बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आहेत...
पक्षांतर्गत गटबाजीला वैतागून बाबाजानी दुर्राणी यांचा राजीनामा!
Babajani durraniSarkarnama

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजीने डोक वर काढलं होत. त्यामुळे ते पक्षातील काही लोकांवर नाराज असल्याचे सांगण्यात आले होते. याच गटबाजीला वैतागून दुर्राणी यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

दुर्राणी यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवला आहे. नवीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यापूर्वीच बााबाजानी दुर्रानी यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा एक झटका मानला जात आहे. दुर्रानी यांच्या राजीनाम्यानंतर आता जिल्हाध्यक्ष कोण होणार याची चर्चा परभणीमध्ये सुरु आहे.

Babajani durrani
भाजपच्या साथीने राष्ट्रवादीच्या सहकारमंत्र्यांनी उधळला गुलाल

काही दिवसांपूर्वी झाली होती मारहाण

आमदार बाबाजानी दुर्राणी यांना मागच्या आठवड्यात एका व्यक्तीने मारहाण केल्याची घटना समोर आली होती. गुरुवारी दुर्राणी हे पाथरी शहरातील एका अंत्यविधीला गेले होते. त्यावेळी शोकाकुल वातावरणात बाकड्यावरून बसून सहकाऱ्यांशी बोलत असताना मोहम्मदबीन सईदबीन किलेब नामक इसम आमदार दुर्राणी यांच्यासमोर आला. त्यावेळी त्याने अश्लील भाषेत त्यांना शिवीगाळ करत त्यांच्या कानशिलात लगावल्या.

Babajani durrani
शशिकांत शिंदेंचा ठरवून करेक्ट कार्यक्रम झाला?

मारेकऱ्याने एवढ्यावरच न थांबता दुर्रानी यांना त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी सध्या फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in