Marathwada Bjp News : मिशन छत्रपती संभाजीनगर ; अभिवादनाला भाजपचे पाच मंत्री..

Bjp : भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देखील पार पडली.
Marathwada Bjp News
Marathwada Bjp News Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शहरात भाजप आणि शिंदे गटाकडून टीव्ही सेंटर येथे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगरची लोकसभा (Loksabha Constituency) भाजप लढवणार? की मग शिंदे गट यावर चर्चा सुरू आहे. दोन्ही गटाच्या स्थानिक नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात असले तरी यावर अद्याप वरिष्ठ नेत्यांकडून कुठलेही भाष्य केले गेलेले नाही.

Marathwada Bjp News
Devendra Fadanvis On Karnataka : आमचा रेट इतरांपेक्षा चांगला, कधी जिंकतो कधी हरतो...

पंरतु आज टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी केंद्रातले तीन आणि राज्यातले दोन असे पाच मंत्री हजर होते. (Devendra Fadanvis) हे चित्र बरेच काही सांगून जाणारे आणि लोकसभेची ही जागा कोण लढवणार यांचे संकेत देणारे होते. राज्यातील सत्तांतरानंतर छत्रपती संभाजीनगरवर शिंदे गटापेक्षाही जास्त लक्ष (Bjp) भाजपने केंद्रित केले आहे.

आज राजपूत समाजाच्या महासंमेलनानिमित्त शहरात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. (Marathwada) त्यामुळे केंद्रातील दोन राज्यमंत्री दानवे आणि डाॅ. कराड हे तसेच राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे देखील आवर्जून उपस्थितीत होते. या सगळ्यांनी एकत्रिपणे जावून टीव्ही सेंटर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

आतापर्यंत अनेकवेळा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. पण एवढ्या मंत्र्यांची अभिवादनासाठी एकाचवेळी उपस्थिती असा योग यापुर्वी कधी आला नव्हता. कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता गेली असली तरी पराभवाला कवटाळून बसणारा हा पक्ष नाही हे प्रत्यक्ष कृतीतूनही दिसून आले आहे. शिंदे गटाने देखील वाहन रॅली काढत छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले. ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील छत्रपती संभाजी महाराजंना पुष्पहार अर्पण केला.

पण या सगळ्या अभिवादन सोहळ्यावर छाप होती ती भाजपची. एकाच दिवशी भरगच्च कार्यक्रमांची आखणी करत भाजपने अनेक गोष्टी साध्य केल्या. राजपूत समाजाच्या महासंमेलनाला हजेरी लावत एकप्रकारे भाजपने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच फोडला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण या कार्यक्रमाच्या आधाची भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देखील पार पडली.

Marathwada Bjp News
Bhumre-Khaire News : दानवेंशी गुफ्तगू, खैरेंना पाहताच भुमरेंचा काढता पाय...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी काळात पक्षाची रणनिती काय असेल? यासह स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकी संदर्भात देखील या बैठकीत आढावा घेण्यात आल्याचे समजते. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com