Tata Airbus : महाराष्ट्राची हेटाळणी दुर्दैवी; गुजरातपुढे आपण दबून चाललोय का...

तीन महिन्यात तीन प्रकल्पांची गुंतवणूक महाराष्ट्रातून Maharashtra गुजरातकडे Gujrat गेल्याने महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi नेत्यांनी शिंदे-फडणवीस Shinde-Fadanvis सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
Congress Leader Ashok Chavan
Congress Leader Ashok Chavansarkarnama

नांदेड : महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याची अशी हेटाळणी होतेय हे दूर्दैव आहे. गुजरातला गुंतवणूकीसाठी प्राधान्य मिळतंय याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आपल्या राज्यात गुंतवणूक का येत नाही, आपण गुजरातपुढे दबून चाललोय का, हे पाहणे गरजेचे आहे, अशी टीका काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे.

नागपूरमधील प्रस्तावित टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर रणंकदन सुरू झाले आहे. तीन महिन्यात तीन प्रकल्पांची गुंतवणूक महाराष्ट्रातून गुजरातकडे गेल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याची अशी हेटाळणी होतेय हे दुर्दैव आहे. आपल्याकडे येणारी गुंतवणूक दुसरीकडे जातेय याकडे सरकारचे लक्ष नाही. सरकार गुंतवणूक आणण्यासाठी पुढाकार घेत नाही. त्यामुळे राज्यातील रोजगार निर्मितीचे काम ठप्प झाले आहे.

Congress Leader Ashok Chavan
Tata Airbus : गुजरात निवडणुका जिंकण्यासाठीच प्रकल्प पळवले : रोहित पवारांचा आरोप!

गुंतवणूकीसाठी गुजरातला प्राधान्य मिळतंय, याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. महाराष्ट्र देशात गुंतवणूकीसाठी आघाडीवर असताना सलग तिसरा प्रकल्प बाहेर जाणे हे योग्य नाही. पण याबाबत मी कोणत्याही निष्कर्षावर येत नाही. ही खेदाची बाब असून हे आता कोणाच्यावेळी झालं याचा दोषारोप टाकण्यापेक्षा राज्यात गुंतवणूक का येत नाही. आपण गुजरातपुढे दबून चाललोय का, हे पाहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमुद केले.

Congress Leader Ashok Chavan
Tata Airbus : गुजरातला वेगळा देश निर्माण होणार आहे का... सतेज पाटलांचा सवाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in