अनिल परब, सुभाष देसाई हे 'मातोश्री'चे गोचीड, रक्त पिऊन कसे टम्म झाले...

Shivsena : मंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेना नेते अनिल परब आणि सुभाष देसाई यांच्यावर टीका केली आहे.
Anil Parab, Subhash Desai, Sandipan Bhumre Latest News
Anil Parab, Subhash Desai, Sandipan Bhumre Latest NewsSarkarnama

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यावर त्यांनी भाजप आणि सोबत आलेल्या आमदारांच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. यानंतर शिंदे गट आणि शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. तसेच, शिवसेना कुणाची अणि पक्षचिन्ह कुणाचं? यावरूनही दोन्ही बाजूंनी दावे केले जात आहेत.

दरम्यान, शिवसेनेचा परंपरागत असलेल्या दसरा मेळाव्यावरून देखील या दोन्ही गटात चुरस निर्माण झाली आहे. मुंबईत होत असलेल्या दोन्ही गटाच्या मेळाव्यास गर्दी जमवण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून या तयारीच्या औरंगाबात येथील सभेत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आणि शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्यावर देखील टीका केली असून त्यांना 'मातोश्री'चे गोचीड, असा त्यांचा उल्लेख केला आहे. (Anil Parab, Subhash Desai, Sandipan Bhumre Latest News)

Anil Parab, Subhash Desai, Sandipan Bhumre Latest News
भुमरे म्हणतात, मुख्यमंत्री शिंदेंमुळेच उद्धव ठाकरेंचं दुखणं गेलं,त्यांनीच आभार मानावे...

भुमरेंनी औरंगाबाद येथील सभेत बोलतांना शिवसेना नेतृत्व आणि माजी मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर उद्धव ठाकरे यांच्या गळ्याचा पट्टा गेला, मास्क गेला, दुखणं गेलं,आता मातोश्री वर सगळ्यांना इन्ट्री असून आता आदित्य, तेजस, वरूण बाहेर आला, आता तर रश्मी ठाकरे पण बाहेर आल्या आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभार मानले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना चिमटा काढला.

Anil Parab, Subhash Desai, Sandipan Bhumre Latest News
दसरा मेळाव्याची एकाच वेळी दोन्ही भाषणे सुरु झाली तर कुणाचं ऐकणार? अजितदादांंचं थेट उत्तर...

भुमरे पुढे म्हणाले, अनिल परब, सुभाष देसाई हे 'मातोश्री'चे गोचीड आहेत. ते कसे रक्त पिऊन टम्म झाले आहेत. तो देसाई काही बोलला की, जातो निघून म्हणायचं. अरे सत्ता आम्ही दिली होती. संदीपान भुमरेंना कोणते मंत्रिपद दिले, जिथे कोणीही गुच्छ देत नाहीत आणि पालकमंत्री गद्दाराच्या दिले आणि आम्हाला गद्दार म्हणता, अशा शब्दात त्यांनी परब आणि देसाईंना सुनावले आहे. भुमरेंच्या टीकेवर आता सेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com