मंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात दाखल; कामकाजाला केली सुरुवात...

Dhananjay Munde|Pankaja Munde : दोन दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेतल्यानंतर आजपासून धनंजय मुंडे आपल्या मंत्रालयात रुजू झाले आहेत.
मंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात दाखल; कामकाजाला केली सुरुवात...
Dhananjay MundeSarkarnama

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी आज (ता.18 एप्रिल) पुन्हा आपल्या मंत्रालयीन कामकाजाला सुरुवात केली आहे. गेल्या मंगळवारी (12 एप्रिल) दिवसभराचे कामकाज अटोपल्यानंतर सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना तत्काळ मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात 4 दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी (ता.16 एप्रिल) त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. दोन दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेतल्यानंतर आजपासून त्यांनी पुन्हा आपल्या मंत्रालयाच्या कामकाजास सुरुवात केली आहे.

Dhananjay Munde
जयश्री पाटलांच्या अडचणीत वाढ; सवाल करणाऱ्या महिलेवर उचलला हात...

मुंडे हे आज दुपारी एक वाजताच्या सुमारास मंत्रालयात आले. त्यांनी विभागाचे सचिव सुमंत भांगे उपसचिव दिनेश इंगळे खाजगी सचिव डॉ. प्रशांत भामरे यांच्यासमवेत विभागाच्या विविध विषयांवर चर्चा केली. मंत्रालयातील टपाल महत्त्वाच्या नस्ती यावर त्यांनी सही केल्या तसेच, भेटायला आलेल्या या गटांच्या भेटी घेतल्या आहेत.

मुंडे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांना ह्रद्यविकाराचा झटका असल्याचे म्हटलं जात होते. मात्र, तपासण्याअंती त्यांना ह्रद्यविकाराचा झटका नसल्याचे समोर आले होते. मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर त्यांच्या भेटीसाठी अनेक मंत्री रूग्णालयात गेले होते. रूग्णालयातून सुटी मिळाल्यावर मुंडेंनी आपल्याला भेटायला आलेले सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व आपल्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आणि डॅाक्टरांचे आभार मानले होते. काही दिवस डॅाक्टरच्या सल्ल्यानुसार आराम केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीला पुन्हा येईल, असे म्हटले होते. आता त्यांना बरे वाटू लागल्याने त्यांनी आपल्या मंत्रालयाच्या कामकाजास सुरूवात केली आहे.

Dhananjay Munde
तीन तासांच्या चौकशीनंतर सोमय्या म्हणाले, सत्याचा विजय होईल

दरम्यान, मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले ही माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे आणि बहिण पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे, यशश्री मुंडे आणि पंकजा यांच्या आई प्रज्ञा मुंडे देखील रूग्णालयात दाखल झाल्या होत्या आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. आता मुंडेंच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांनी आपल्या मंत्रालयाचे कामकाज पुन्हा सुरू केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.