MIM : `राजसभे`ला एमआयएमचा ना विरोध ना समर्थन..

राज ठाकरेंच्या सभेवर एमआयएम आक्रमक भूमिका घेईल, अशी अपेक्षा बाळगून असणाऱ्यांचे मनसुबे इम्तियाज यांच्या भूमिकेने उधळले गेले आहेत. (Mp Imtiaz Jalil)
Mp Imtaiz Jalil-Raj Thackeray
Mp Imtaiz Jalil-Raj ThackeraySarkarnama

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उद्या (ता.१) महाराष्ट्र दिनी होणाऱ्या औरंगाबादेतील सभेची चर्चा राज्यातच नव्हे तर देशभरात सुरू आहे. (MNS) मशिदीवरील भोंग्याचा वादग्रस्त विषय घेऊन उद्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलतात? याकडे देखील सर्वच राजकीय पक्षांचे व त्यांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एमआयएमने घेतलेल्या भूमिकेची देखील चांगलीच चर्चा होत आहे.

ऐरवी मुस्लिम समाजाच्या कुठल्याही विषयावर आक्रमकपणे मैदानात उतरणाऱ्या एमआयएमने या सगळ्या प्रकाराकडे मैदानाबाहेर प्रेक्षक म्हणून तटस्थ पाहण्याची भूमिका घेतली आहे. (Aurangabad) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी राजसभेच्या पुर्वी पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिया यातून राज ठाकरे यांच्या सभेला एमआयएमचा ना विरोध ना समर्थन असेच चित्र दिसून आले.

आयुक्तांसोबतच्या बैठकीत निश्चितच खासदार इम्तियाज जलील यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी पोलिसांची असेल असे सांगितले असणार. परंतु माध्यमांसमोर त्यांनी अत्यंत सामंजस्याची भूमिका घेतली. हिंदुत्ववादी आणि खरा हिंदूचा रक्षक कोण यासाठी शिवसेना-भाजप आणि मनसेमध्ये स्पर्धा लागली आहे. परंतु औरंगाबादची जनता आता या सगळ्या गोष्टींना चांगली ओळखून आहे. त्यामुळे शहरातील वातावरण शांत राहील, कुठेही दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा घटना घडणार नाही, याचा मला विश्वास आहे.

लोकांमध्ये, विशेषतः व्यापाऱ्यांमध्ये घबराट आहे. कारण कोरोनानंतर आता कुठे व्यापार, उद्योग रुळावर येत आहेत. रमजानची खरेदी ही शेवटच्या तीनचार दिवसांतच अधिक होत असते, अशावेळी ही सभा होत असल्याने काळजी वाटणे सहाजिक आहे. पण मी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्हीी समाज बांधवांना आश्वस्त करतो की, शहराचे वातावरण बिघडू देणार नाही, असा विश्वास इम्तियाज जलील यांनी औरंगाबादकरांना दिला.

विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्या सभेबद्दल त्यांनी कुठलेही वादग्रस्त किंवा तेढ निर्माण करणारे वक्तव्य न करता ते येतील आपल्या पक्षाचा अजेंडा राबवणारे भाषण करतील, अशी संयमी प्रतिक्रिया दिली. रमजानच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने घेतलेली ही संयमी भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. पोलिसांवरील ताण देखील यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे.

Mp Imtaiz Jalil-Raj Thackeray
राज ठाकरे आमचे पाहुणे ; इम्तियाज जलील यांच्याकडून इफ्तार पार्टीचं निमंत्रण

शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न वैयक्तिक वादाच्या घटनांना धार्मिक रंग देऊन करण्यात आला होता. जबरदस्तीने जय श्रीराम म्हणायला लावून दोघांना मारहाण झाल्याची अफवा काल शहरात पसरली होती. परंतु पोलिसांनी आणि दोन्ही बाजूच्या नागरिकांनी अगदी शांतपणे हाताळले आणि यातून कुठलाही चुकीचा प्रकार घडणार नाही, हे बघितले.

राज ठाकरेंच्या सभेवर एमआयएम आक्रमक भूमिका घेईल, अशी अपेक्षा बाळगून असणाऱ्यांचे मनसुबे इम्तियाज यांच्या भूमिकेने उधळले गेले आहेत. आता उद्याची राजसभा निर्विघ्न पार पडली म्हणजे, औरंगाबादकर आणि येथील लोकप्रतिनिधींच्या संयमाचाच तो विजय असेल,असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com