Maratha Reservation |
Maratha Reservation |

Maratha Reservation : 19 सप्टेंबरला धडकणार मोर्चा

Maratha Reservation | मोर्चासाठी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

कळंब : मराठा आरक्षणप्रश्नी सकल मराठा समाज मंडळाच्या वतीने येत्या १९ सप्टेंबर रोजी कळंब येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे यासाठी १ लाख मराठा बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

त्याच दिवशी दुपारी १२ वाजता तांदळवाडी रोडवरील बालकआश्रमात महिला मराठा क्रांती मोर्चा वतीने बैठक बोलण्यात आली आहे. याबैठकीला सर्व महिलांना व मुलींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, मोर्चासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्वांनी सहकार्य करण्यास सांगण्यात आले आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन मराठा समाजाची एकजूट व शिस्त दाखवावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

अशी असेल मोर्च्याची आचारसंहिता

१] मोर्चा शांततेत निश्चित करण्यात आलेल्या मार्गानेच निघेल.

[विद्याभवन हायस्कूल- छ.शिवाजी महाराज पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरुन - नगरपरिषद शाळा क्र.१ चे मैदान]

२] मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाच्या, संघटनेच्या व व्यक्तिच्या विरोधात किंवा समर्थन करणाऱ्या घोषणा दिली जाणार नाही.

३] मोर्चात प्रथम विद्यार्थींनी - महिला - विद्यार्थी- सर्वसामान्य जनता नंतर शेवटी राजकीय व विविध संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी राहतील.

४] मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठा व्यक्तिला पोलीस, समन्वयक व स्वंयसेवक यांनी दिलेल्या सुचनेचे तंतोतंत पालन करावे लागेल.

५] गडबड गोंधळ किंवा मोर्चाला बाधा येईल असे वर्तन करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल.

६] मोर्चा सभास्थळी आल्यावर त्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला [ ती कितीही मोठी असली तरी] बोलण्याची संधी मिळणार नाही.

७] या मोर्चात कोणी मोठा नाही किंवा कोणीही छोटा नाही सर्व मराठा बांधव समपातळीवरच असतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.

८] मोर्चात सर्व मराठा बंधू-भगिनींना रांगेमध्येच चालावे लागेल, मनमानी करता येणार नाही.

९] मोर्चात ठराविकच घोषणा असतील व त्या स्वंयसेवक देतील त्यास पाठीमागे आपण सर्वांनी प्रतिसाद द्यायचा आहे. आपणास वाटेल ती घोषणा देता येणार नाही.

१०] हा मोर्चा CCTV ,विविध कॅमेरे व ड्रोन च्या नियंत्रणाखाली असल्यामुळे आपली प्रत्येक हालचाल पोलीस यंत्रणेला दिसणार आहे याची नोंद घ्यावी.

११] अशी असेल पार्कींग व्यवस्था

आपली वाहने ठरवून दिलेल्या ठीकाणीच पार्क करावीत.

अ] येरमाळा -वाशी कडुन येणाऱ्या वाहनासाठी पंचायत समिती समोरील पोलीस मैदानवर व्यवस्था आहे.

ब] ढोकी-शिराढोन कडुन येणारी वाहने डाँ.बाबासाहेब आंबेडकर [केब्रीज] विद्यालय व शिक्षणमहर्षी मोहेकर क्रीडा संकुल डीकसळ येथे व्यवस्था आहे.

क] केज-आंबाजोगाई कडुन येणाऱ्या वाहनाची व्यवस्था [बायपास रोड] १०१ नगर शेजारील मैदान व रणसम्राट क्रीडांगणावर करण्यात आली आहे

आपली वाहने ठरवून दिलेल्या वाहन तळावरच लावून सहकार्य करावे.

१२]आपला हा मोर्चा आदर्श मोर्चा असावा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा मोर्चा म्हणून तो महाराष्ट्र उठून दिसावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com