VJNT Maha Morcha News: `व्हीजेएनटी`, बोगस प्रमाणपत्राच्या विरोधात महामोर्चा..

Marathwada Politics : कर्नाटक राज्यात सत्ता बदल झाला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात परिवर्तन घडवून दाखवा.
VJNT March News
VJNT March NewsSarkarnama

Aurangabad Political News : व्हीजेएनटी प्रवर्गाचे बनावट प्रमाणपत्र घेऊन फायदा घेणाऱ्यांची व बोगस प्रमाणपत्र वितरित करणाऱ्यांची चौकशी एसआयटी मार्फत (विशेष तपासणी पथक) तातडीने करण्यात यावी, यासह अन्य मागण्यासाठी बंजारा, राजपूत भामटा, भटके विमुक्त समाज कृती समितीने विभागीय आयुक्तालयावर `पांढरे वादळ` भव्य महामोर्चा काढला. राज्य सरकारने दोन आठवड्यात एसआयटीबाबत निर्णय घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी झालेल्या सभेत देण्यात आला.

VJNT March News
Dhananjay Munde News : कोणत्याही अडचणीत सोबत राहू, क्षीरसागर पिता-पुत्राला मुंडेंनी दिला शब्द..

क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर `पांढरे वादळ` महामोर्चाला दुपारी सुरवात झाली. (Aurangabad) आमदार राजेश राठोड, माजी आमदार हरिभाऊ राठोड, कृती समितीचे नेते राजपालसिंह राठोड यांच्या नेतृत्वाखाली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Marathwada) पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी लक्ष वेधले. संत सेवालाल महाराज, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

सभेनंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तामार्फत मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला सादर केले. मोर्चात होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (Maharashtra) आमदार राजेश राठोड यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका केली. कर्नाटक राज्यात सत्ता बदल झाला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात परिवर्तन घडवून दाखवा. न्याय मिळविण्यासाठी चळवळ अधिक तीव्र करा, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. साळुंखे यांनी समाजाच्या प्रश्नावर जे लोकप्रतिनिधी आवाज उठविणार नाही, त्यांना तांडा परिसरात प्रवेश देऊ नको, असे विधान केले. यावेळी समितीच्या अन्य नेत्यांनी भाषण झाले. मागण्यांबाबत शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही समितीने दिला.

या आहेत मागण्या

-जात वैधता प्रमाणपत्र संबंधित सर्व कागदपत्र संकेतस्थळावर ऑनलाइन वेळोवेळी प्रसारित करण्यात यावे.

-प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा जात प्रमाणपत्र परीक्षा समितीमध्ये शासकीय प्रतिनिधी म्हणून मूळ विमुक्त व भटक्या जमातीतील सामाजिक कार्यकर्त्यांची नियुक्ती करा.

-नॉन क्रिमिलेअर व पदोन्नती संबंधित प्रलंबित प्रकरणे निकाली काढा.

-१०६१ च्या अगोदरचा जात संबंधी पुरावा अनिवार्य करावा.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in