Marathwda : बागडेंची निवडणूक लढण्यास `ना ना`, इच्छुकांना आनंदाच्या उकळ्या..

बागडे यांनी यापुर्वीच्या आपल्या अनेक भाषणातून आपणच पुढचे आमदार असणार असे जाहीरपणे सांगितले होते. मग अचानक त्यांना सालदार राहण्याची इच्छा का बरे राहिली नाही? असा देखील प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. (Mla Haribhau Bagde)
Mla Haribhau Bagde News, Aurangabad
Mla Haribhau Bagde News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : विधानसभेचे माजी अध्यक्ष, भाजपमधील ज्येष्ठ नेते आणि फुलंब्रीचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांनी नुकतीच एक महत्वाची घोषणा केली. ती म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक आपण आता लढणार नाही, इच्छुकांनी तयारी लागावे, असे आवाहन त्यांनी दिवाळी निमित्त आयोजित एका कार्यक्रमात केले. पुर्व आणि फुलंब्रीमधून प्रत्येकी दोनवेळा निवडून आलेल्या बागडेंनाच २०२४ मध्येही उमेदवारी दिला जाईल असे दिसत असतांना किंवा त्यांच्याकडून देखील तयारी सुरू असतांना अचानक त्यांनी ही भूमिका घेतल्याने अनेकांना धक्का बसला.

Mla Haribhau Bagde News, Aurangabad
Marathwada : शिंदे गटाचे नाही, तर काँग्रेस- राष्ट्रवादी- उद्धवसेनेचे आमदार फुटणार...

फुलंब्री मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांना मात्र बागडे नांनानी ही दिवाळी भेटच दिली असे म्हणावे लागेल. (Marathwada) माझी सालदारकी संपत आली आणि आता पुन्हा सालदार होण्याची आपली इच्छा नाही, अशा शब्दात बागडे (Haribhau Bagde) यांनी आगामी विधानसभा निवडणूक आपण लढणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

फुलंब्री या आपल्या मतदारसंघातील कार्यक्रमात माझी सालदारकी संपत आली असून आता केवळ दीड वर्ष बाकी आहे. आणि आता पुन्हा सालदार होण्याची माझी मुळीच इच्छा नाही. त्यामुळे अनेकांच्या आशा आकांक्षा निश्चितच वाढल्या आहे. त्यामुळे या सगळ्यांचे देव भले करो, अशा शब्दात हरिभाऊ बागडे यांनी इच्छुकांचा मार्ग मोकळा असल्याचे स्पष्ट केले.

फुलंब्री येथील समता विद्या मंदिर शाळेच्या परिसरात नगराध्यक्ष तथा भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या दीपप्रज्वलानंतर आमदार हरिभाऊ बागडे यांचे भाषण झाले, आयोजकांचे कौतुक करतानाच माझे सालदारकीचे केवळ दीड वर्ष बाकी असून पुन्हा सालदार होण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे अनेकांच्या आशा व आकांक्षा निश्चितच वाढल्या आहेत. अशा सर्वांचे परमेश्वर भलं करो, या सर्वांनाच माझ्या शुभेच्छा आहे, असे म्हणत त्यांनी उपस्थितांवर बाॅम्बच टाकला.

फुलंब्री मतदारसंघात आमदार होण्याचे स्वप्न बाळगून असलेले अनेकजण आहेत. पण नानाच्या पुढे कोणाची काही चालत नाही, अशी परिस्थिती. एकदर पक्षातील ज्येष्ठ नेते, राजकारण आणि समाजकारणाचा दांडगा अनुभव आणि वरिष्ठ पातळीवर नानांनाच्या शब्दाला मोठी किंमत आहे. त्यामुळे जोपर्यंत नाना ठरवत नाही, तोपर्यंत दुसऱ्याला संधी मिळणार नाही हे स्पष्ट होते. परंतु भाजपमध्ये आता काही नवे प्रघात पडायला लागले आहेत. यापैकी वय हा एक नवा निकष उमदेवारी मिळवतांना अडसर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mla Haribhau Bagde News, Aurangabad
Shivsena : सणासुदीला पण लोक इज्जत काढतात ; दानवेंचा शिंदे गटाला टोला

बागडे यांनी यापुर्वीच्या आपल्या अनेक भाषणातून आपणच पुढचे आमदार असणार असे जाहीरपणे सांगितले होते. मग अचानक त्यांना सालदार राहण्याची इच्छा का बरे राहिली नाही? असा देखील प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. नानांच्या या भूमिकेमुळे पाच वर्षापासून मतदारसंघात जोर लावत असलेल्या इच्छुकांच्या मात्र आशा पल्लवित झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे ध्येय धोरण मला माहिती असून थांबण्याचा हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी स्वतःही पक्षप्रमुख असतो तरीही मी थांबण्याचाच निर्णय घेतला असता.

त्यामुळे आगामी काळात पक्ष जो काही निर्णय घेईल तो मला मान्यच राहील, या बागडे यांच्या विधानातून त्यांना उमेदवारी मिळणार नाही, असेच दिसते. त्यामुळेच त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे. माजी सभापती अनुराधा चव्हाण, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाट, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे हे फुलंब्रीमधून लढण्यास इच्छुक आहेत. या सगळ्यांकडे गाॅडफादर असल्यामुळे प्रत्येकजण उमेदवारीसाठी शक्तीपणाला लावणार आहे. त्यामुळे भविष्यात उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तुर्तास नानांच्या निर्णयामुळे इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in