Marathwada : शिंदे गटात प्रवेश करणारा मराठवाड्यातील `तो` खासदार कोण ?

जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांनी वारंवार जेव्हा त्यांच्या नावाची चर्चा शिंदे गटात जाणार म्हणून झाली, तेव्हा तेव्हा त्याचे खंडन करत ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे दाखवून दिले. (Marathwada)
Mp Omraje Nimabalkar-Sanjay Jadhav News Marathwada
Mp Omraje Nimabalkar-Sanjay Jadhav News MarathwadaSarkarnama

औरंगाबाद : अवघ्या काही तासातच मुंबईत शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यांमधून मोठे राजकीय भूकंप आणि उलथापालत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Shivsena) शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी आज शिंदे मेळाव्यात उद्धव ठाकरे गटाचे पाच आमदार आणि दोन खासदार प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे तुमाने यांनी दोन पैकी एक खासदार हा मराठवाड्यातील असल्याचा देखील दावा केला आहे. उद्धव ठाकरे गटाचे मराठवाड्यात तीन खासदार आहेत, परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद. यापैकी हिंगोलीचे हेमंत पाटील हे आधीच शिंदे गटात सामील झाले आहेत. आता परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव (Sanjay Jadhav) आणि उस्मानाबादचे ओमराजे निंबाळकर (Omraje Nimabalkar) हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत.

खासदार कृपाल तुमाने यांचा दावा खरा ठरला तर या दोघांपैकी कोण शिंदे गटात जाणार? याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदेंच्या बंडाला मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात बळ मिळाले होते. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातून सहापैकी पाच आमदार हे शिंदे गटात गेले होते, परंतु हिंगोली वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात शिवसेनेला फारसा धक्का बसला नव्हता.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील व कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे ठाकरे गटाला काही प्रमाणात नुकसान सोसावे लागले. परंतु परभणी आणि उस्मानाबाद हे दोन्ही जिल्हे तानाजी सावंत, ज्ञानराज चौघुले, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांचा अपवाद वगळता ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले.

Mp Omraje Nimabalkar-Sanjay Jadhav News Marathwada
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, तुम्ही कोणाचं भाषण ऐकणार? पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं

जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांनी वारंवार जेव्हा त्यांच्या नावाची चर्चा शिंदे गटात जाणार म्हणून झाली, तेव्हा तेव्हा त्याचे खंडन करत ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे दाखवून दिले होते.

आता कृपाल तुमाने यांचा दावा जर खरा ठरला तर शिंदे गट जाधव की ओमराजे निंबाळकर यापैकी कुणाला आपल्या गळाला लावणार याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. की मग बीकेसी वरील मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी केलेले हे विधान होते, हे अवघ्या काही तासातच स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com