Marathwada : राज्यातील वारकऱ्यांसाठी स्वंतत्र बॅक उभारणार ; भुमरेंची घोषणा..

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणमध्ये संत स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते. (Marathwada News)
Guardian Minister Sandipan Bhumre News, Aurangabad
Guardian Minister Sandipan Bhumre News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : `संत आले संत आले,आवघे घर आनंदले, हर्ष दाटला जळी स्थळी, रोम रोम पांडुरंग झाले` या उक्तीप्रमाणे संत सस्नेह मिलनाचा कार्यक्रम पैठण येथे पार पडला. मराठवाड्यातील संत, महंत, किर्तनकार, प्रवचनकार यांच्या उपस्थितीत दिपावली संत स्नेहमिलन कार्यक्रमात रोजगार हमी फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आवर्जून हजेरी लावली.

Guardian Minister Sandipan Bhumre News, Aurangabad
Aurangabad : मेट्रो, अखंड उड्डाणपूल कागदावर, सहा हजार आठशे कोटींचा डीपीआर तयार..

संत, महंत, महाराज यांनी संत सस्नेह मिलनात मांडलेल्या सर्व मागण्या पुर्ण करण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही देतांनाच पैठण (Paithan) घाटावर आरती ,व एकनाथी भागवती मंदिराची उभारणी करण्याची घोषणा भुमरे (Guardian Minister) यांनी केली. या शिवाय महाराष्ट्रातील वारकऱ्यांसाठी `वारकरी` बँकेची उभारणी करण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यानंतर सर्व संत महंताचे पुजन करुन त्यांच्यासोबत भुमरे यांनी स्नेह भोजनही घेतले.

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणमध्ये संत स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते. संदीपान भुमरे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतरचा पैठणमधील हा पहिलाच स्नेहमिलन मेळावा असल्याने ते यावेळी काय घोषणा करतात? याकडे उपस्थीत वारकरी, संत, महंताचे लक्ष लागले होते.

पैठण तीर्थ क्षेत्राव्यतिरिक्त अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्याला पालकमंत्री भुमरे यांनी तातडीने मान्यता देण्याचे आश्वासन दिले. या शिवाय वारकऱ्यांसाठी राज्यात स्वतंत्र वारकरी बॅंक उभारण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी केशव महाराज चावरे,आपेगाव संस्थानचे ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापुरकर,रखमाजी महाराज नवले,विठ्ठल महाराज चनघटे शास्री,नारायनानंद स्वामी,विष्णु महाराज जगताप,नामदेव महाराज पोकळे, नाथ संस्थानचे कार्यकारी विस्वस्त बाजीराव बारे यांच्यासह संत महंताची प्रमुख उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in