Marathwada Teacher Constituency : मतदारांमधील उत्साह काळेंच्या की पाटलांच्या पथ्यावर?

Marathwada : प्रत्यक्ष मतदान झाले त्यानंतर या बंडखोरांचा प्रभाव जाणवला नसल्याचे स्पष्ट झाले.
Marathwada Teachers Constituency News, Aurangabad
Marathwada Teachers Constituency News, AurangabadSarkarnama

Aurangabad : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आज झालेल्या निवडणुकीत मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. दुपारी दोन वाजेपर्यंतच सरासरी ६० टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली होती. पुढच्या दोन तासांत १५ ते २० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे साधरणतः ७५ टक्के एवढे मतदान अपेक्षित आहे. आता शिक्षक मतदारांमधील हा उत्साह महाविकास आघाडीच्या विक्रम काळेंच्या (Vikram Kale) पथ्यावर पडतो ? की मग भाजपच्या किरण पाटील यांच्या हे २ फेब्रुवारी रोजीच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

Marathwada Teachers Constituency News, Aurangabad
Pankaja Munde News : भाजपच्या जवळ आलेल्या क्षीरसागरांना मुंडेंचा नमस्कार `स्वागता`चा कि `रामराम`चा..

मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. (Marathwada) महाविकास आघाडी आणि भाजपचे (Bjp) नेते मतदान केंद्रावर आणि परिसरात दिसले. मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह मराठवाड्यातील इतर नेते मतदान करवून घेण्यासाठी बारकाईने लक्ष देत होते. मतदारसंघात एकूण चौदा उमेदवार रिंगणात होते, महाविकास आघाडीकडून विक्रम काळे, भाजपचे प्रा. किरण पाटील यांच्यात मुख्य लढत झाली.

राष्ट्रवादीचे प्रदीप सोळुंके आणि भाजपकडून नितीन कुलकर्णी यांनी बंडखोरी केल्यामुळे त्याचा काही परिणाम होतो का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु आज जेव्हा प्रत्यक्ष मतदान झाले त्यानंतर या बंडखोरांचा प्रभाव जाणवला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप या दोन पक्षांमध्येच लढत झाली. प्रहार, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या कामगिरीवरच शिक्षक आमदार पहिल्याच पंसतीत विजयी होणार ? की मग दुसऱ्या पसंतीच्या कोट्यातून निकाल लागतो याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

शिक्षक मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. औरंगाबाद येथील कृषी विद्यालयातील मतदान केंद्रावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, आमदार सतीश चव्हाण यांनी भेट देऊन झालेल्या मतदानाचा आढावा घेतला.

या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद..

काळे विक्रम वसंतराव - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रा.पाटील किरण नारायणराव - भारतीय जनता पार्टी, माने कालीदास शामराव - वंचित बहुजन आघाडी, अनिकेत भीमराव वाघचवरे पाटील - अपक्ष, प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर (के.सागर) - अपक्ष, आशिष (आण्णा) आशोक देशमुख - अपक्ष.

कादरी शाहेद अब्दुल गफुर - अपक्ष,नितीन रामराव कुलकर्णी - अपक्ष, प्रदीप दादा सोळुंके - अपक्ष, मनोज शिवाजीराव पाटील - अपक्ष, विशाल (विक्की) उद्धव नांदरकर - अपक्ष, सुर्यकांत संग्राम विश्वासराव - अपक्ष, संजय विठ्ठलराव तायडे - अपक्ष, ज्ञानोबा चिमनाजी डुकरे - अपक्ष असे एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com