Marathwada Teacher Constituency News, Aurangabad
Marathwada Teacher Constituency News, AurangabadSarkarnama

Marathwada Teacher Constituency : काळेंच्या प्रचारापासून काॅंग्रेस दोन हात लांब ?

Congress :`हाथ से हाथ जोडो`, अभियानात जिल्ह्यातील व मराठवाड्यातील काॅंग्रेसचे महत्वाचे नेते व्यस्त आहेत.

Aurangabad : मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचाराला वेग आला आहे. (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत यांच्यासह शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व पदाधिकारी काळेंचा प्रचार करतांना दिसत आहेत. तर दुसरीकडे काॅंग्रेस मात्र प्रचारापासून अलिप्त असल्याचे चित्र आहे.

Marathwada Teacher Constituency News, Aurangabad
Chandrakant Khaire : उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख, मुदत वगैरे असे काही नाही..

काॅंग्रेसचे (Congress) शहर व जिल्हाध्यक्ष यांच्यासह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी `हाथ से हाथ जोडो` अभियानात व्यस्त असल्याचे बोलले जाते. विक्रम काळे यांना (Ncp) राष्ट्रवादीने चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. परंतु प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी करत काळे यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. सोळुंके यांच्या उमेदवारीने काळेंच्या अडचणीत वाढ होत असतांना आघाडीमधील शिवसेना आणि काॅंग्रेस या दोन्ही पक्षांनी पुर्ण ताकदीनिशी प्रचारात झोकून देणे अपेक्षित आहे.

शिवसेना आघाडीचा धर्म पाळतांना दिसत आहे, तर काॅंग्रेस मात्र काळेंच्या प्रचारापासून दोन हात लांब असल्याची चर्चा आहे. काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा कश्मिरमध्ये पोहचली आहे. लवकरच या यात्रेचा समारोप होणार आहे. तर भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात होती, तेव्हाच `हाथ से हाथ जोडो` ही संकल्पना राबवण्याची घोषणा काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केली होती.

शिवाय पटोले यांनी नागपूरच्या पक्ष बैठकीत राज्यात स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचेही जाहीर केले होते. त्यानूसार काॅंग्रेसने `हाथ से हाथ जोडो`, अभियान सुरू केले आहे. परिणामी जिल्ह्यातील व मराठवाड्यातील काॅंग्रेसचे महत्वाचे नेते या अभियानात व्यस्त आहेत. त्यामुळे विक्रम काळे यांच्या प्रचारात काॅंग्रेसचा फारसा सहभाग दिसत नाहीये.

काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व अन्य पदाधिकारी अभियानात व्यस्त असल्यामुळे सध्या काळेंच्या प्रचाराची जबाबदारी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांच्याच खांद्यावर आहे. मतदानाला जेमतेम आठ दिवस आहेत, अशावेळी काॅंग्रेसचा सहभाग नसणे काळेंच्या अडचणीत वाढ ठरू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in