Marathwada Teacher Constituency : शिक्षक आमदारासाठी ६१ हजार गुरुजी करणार मतदान..

Marathwada : मतदारसंघात एकूण चौदा उमेदवार रिंगणात असून विक्रम काळे, प्रा. किरण पाटील यांच्यात मुख्य लढत आहे.
Marathwada Teachers Constituency News, Aurangabad
Marathwada Teachers Constituency News, AurangabadSarkarnama

Aurangabad : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता.३०) २२७ केंद्रांवर मतदान होणार आहे. (Marathwada Teacher Constituency ) ६१ हजार ५२९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यासाठीची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतदान साहित्यासह पथके त्या-त्या केंद्रांवर रवाना झाली आहेत. केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Marathwada Teachers Constituency News, Aurangabad
Eknath Shinde News : महाराष्ट्र ही संतांची भूमी, संत समाजाला दिशा देण्याचे काम करतात..

मतदान सकाळी ८ ते ४ या वेळेत होणार आहे. केंद्रावर मतदारांना मोबाइल किंवा इलेक्ट्रॉनिक कोणत्याही प्रकारची वस्तू घेऊन जाता येणार नाही. (Aurangabad) केंद्रावर अखंडितपणे व्हिडिओग्राफी, वेबकास्टिंग केले जाणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, मतदारसंघात एकूण चौदा उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडीकडून (Ncp) विक्रम काळे, भाजपचे प्रा. किरण पाटील यांच्यात मुख्य लढत आहे.

राष्ट्रवादीचे प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने चुरस वाढल्याचे चित्र आहे. सर्वच उमेदवारांनी आपापल्यापरीने प्रचार केला. प्रहार, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील रिंगणात असल्याने शिक्षक मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हे आहेत उमेदवार

काळे विक्रम वसंतराव - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रा.पाटील किरण नारायणराव - भारतीय जनता पार्टी, माने कालीदास शामराव - वंचित बहुजन आघाडी, अनिकेत भीमराव वाघचवरे पाटील - अपक्ष, प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर (के.सागर) - अपक्ष, आशिष (आण्णा) आशोक देशमुख - अपक्ष.

कादरी शाहेद अब्दुल गफुर - अपक्ष,नितीन रामराव कुलकर्णी - अपक्ष, प्रदीप दादा सोळुंके - अपक्ष, मनोज शिवाजीराव पाटील - अपक्ष, विशाल (विक्की) उद्धव नांदरकर - अपक्ष, सुर्यकांत संग्राम विश्वासराव - अपक्ष, संजय विठ्ठलराव तायडे - अपक्ष, ज्ञानोबा चिमनाजी डुकरे - अपक्ष असे एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com