Marathwada : एकनाथ शिंदेंच्या बंडाला मराठवाड्याचीही साथ

मराठवाड्यातील राजधानीत शिवसेनेने आपली पाळेमुळे रोवली होती. चंद्रकांत खैरे तब्बल चार टर्म शिवसेनेचे खासदार होते. संदीपान भुमरे हे मंत्री तब्बल पाच वेळा पैठणहून निवडून गेले आहेत. (Shivsena)
Marathwada News, Eknath Shinde News
Marathwada News, Eknath Shinde NewsSarkarnama

औरंगाबाद : विधान परिषद निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडात मराठवाड्यातील (Marathwada) सहा आमदारांची नावे समोर येत आहेत. यात औरंगाबादसारख्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यातील दोन मंत्र्यांसकट चार कट्टर आमदारांचा समावेश असल्याचे समजल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आज सकाळी जेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड व त्यातील एकेक आमदारांची नावे समोर येऊ लागताच वातावरण गरम होऊ लागले. (Eknath Shinde News)

विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील संदीपान भुमरे व अब्दुल सत्तार यांच्यासकट औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय सिरसाट, वैजापूरचे रमेश बोरणारे, परंड्याचे तानाजी सावंत, उमरग्याचे ज्ञानराज चौगुले हे सहा आमदार नाॅटरिचेबल असून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये असल्याचे बोलले जाते. मराठवाड्यात शिवसेनेचे (Shivsena) १२ आमदार आहेत. पैकी या सहा आमदारांचे फोन लागत नाहीत किंवा ते नाॅटरिचेबल आहेत.

उस्मानाबादचे कैलास पाटील, परभणीचे डॉ.राहूल पाटील, नांदेडचे बालाजी कल्याणकर, कळमनुरीचे संजय बांगर, औरंगाबादचे (मध्य) प्रदीप जैस्वाल, उदयसिंग राजपूत हे सहा आमदार मात्र शिवसेनेसोबत असल्याचे मानले जात आहे. यातील अनेकांनी स्वतः किंवा त्यांच्या शिवसेनेत असल्याविषयी खात्री दिली आहे.

मुंबईनंतर औरंगाबाद या मराठवाड्यातील राजधानीत शिवसेनेने आपली पाळेमुळे रोवली होती. चंद्रकांत खैरे तब्बल चार टर्म शिवसेनेचे खासदार होते. संदीपान भुमरे हे मंत्री तब्बल पाच वेळा पैठणहून निवडून गेले आहेत. संजय सिरसाट हेही तीन टर्मपासून निष्ठावंत आमदार मानले जातात. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले हेही तीन टर्म आमदार आहेत. त्यामुळे भुमरे, सिरसाट व चौगुले यांचे बंड मराठवाड्यात आश्चर्यकारक मानले जात आहे.

या तिघांशिवाय शिंदेसोबतच्या यादीत असलेले प्रा.बोरणारे व तानाजी सावंत हे पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आले आहेत. तर मंत्री सत्तार हे हरहुन्नरी व अविश्वसनीय राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या बंडाविषयी फार आश्चर्य वाटावे अशी स्थिती नाही. या बंड केलेल्यांपैकी सिरसाट, भुमरे व सत्तार यांनी आपापल्या मुलांना राजकारणात सक्षम करत आणले आहे. थोडक्यात ते त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या शेवटच्या कार्यकालाकडे निघाले आहेत.

तसेच गेल्या काही वर्षांत पक्षातच त्यांची घुसमट होत आहे. तसेच काॅंग्रेस व राष्ट्रवादी सोबतची युतीही अनेकांना मान्य नसल्याचे दिसत आहे. महापालिका निवणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय सिरसाट यांच्या भागातील रस्त्यांना खूप कमी निधी मिळाला तेव्हा सिरसाट यांनी थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत मोठा निधी आणून मोठ्या धुमधडाक्यात या कामांची उद्घाटने केली होती.

Marathwada News, Eknath Shinde News
Eknath Shinde Live Update : शरद पवार रिंगणात उतरले.. ठाकरेंना बदलणार नाही..

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून हे तिन्ही अनुभवी आमदार‌ पक्ष संघटनेपासूनही दूर गेल्याचे भासत होते. २०१९ च्या लोकसभेतील पराभवानंतर झालेल्या विधानसभेत सहा आमदार निवडून येऊनही पक्ष म्हणून शिवसेनेची ताकद राहिलेली नाही. परवा झालेल्या उध्दव ठाकरे यांच्या सभेला सुद्धा फार तयारी करुन गर्दी जमवावी लागली होती.

जिल्ह्यात चंद्रकांत खैरे विरुद्ध आ.अंबादास दानवे व इतर आमदारांचे स्वतंत्र गट अशी गटबाजी आहे. ही गटबाजी व महाविकास आघाडीसोबतचे राजकारण यात शिवसेनेची आपली आक्रमक अशी ओळख संपू लागली आहे. या परिस्थितीचा फायदा भाजपने उचलल्याचे दिसते. अगदी नियमित म्हणावी अशी आंदोलने स्थानिक भाजपकडून शिवसेनेला डिवचण्यासाठी करण्यात येत असतात. शिवसेनेच्या वाघाला कायम मांजर असे म्हणत खिल्ली उडविली जात असते. मुंबई, दिल्लीत मिळविलेले छोटे विजयही शिवसेनेच्या नाकावर टिच्चून साजरे करण्यात येत असतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com