Marathwada : नेत्यांवर बोललो तर गुन्हा, महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर का नाही ?

Harshvardhan Jadhav : माझ्या विरोधात सीबीआय, ईडीचा वापर करता येत नाही, म्हणून पोलिसांचा वापर केला जात आहे.
Ex. Mla Harshvardhan Jadhav News, Aurangabad
Ex. Mla Harshvardhan Jadhav News, AurangabadSarkarnama

Harshvardhan Jadhav News : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या राजकीय विशेषत: Bjp भाजपच्या नेत्यांबद्दल बोललो तर तो गुन्हा ठरतो. मग महापुरुषांचा अवमान करणे हा गुन्हा नाही का? त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का? असा सवाल माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

Ex. Mla Harshvardhan Jadhav News, Aurangabad
Shivsena : बोम्मई ऐकत नाहीत, मग शिंदे गृहमंत्र्यांकडे काॅफी प्यायला गेले होते का ?

महापुरुषांच्या अवमान करणाऱ्या भाजप नेत्यांवर टीका करतांना जाधव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख करत वादग्रस्त भाषा वापरली होती. (Harshavardhan Jadhav) या विरोधात पुण्याच्या दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये दोन दिवसांपुर्वी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल (Fir Filed) झाला.

यावर बोलतांना जाधव यांनी सरकारला जाब विचारला. जाधव म्हणाले, माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचे मला आताच कळले. भाजपच्या नेत्यांवर महापुरुषांचा अवमान केला म्हणून टीका केली तर तो गुन्हा ठरतो. मग वारंवार आमच्या दैवताचे, महापुरुषांचे धिंदवडे राजकारणी लोक काढत आहेत, तो गुन्हा नाही का? त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा का दाखल केला जात नाही?

माझ्या विरोधात सीबीआय, ईडीचा वापर करता येत नाही, म्हणून पोलिसांचा वापर केला जात आहे. आता माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, माझा निवडा न्यायालयात होईलच, पण महापुरूषांचा अवमान करणारे मोकाट कसे? त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाहीत? असा सवाल देखील जाधव यांनी उपस्थितीत केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com