Marathwada : शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले आमदार पाटील यांचे उपोषण सोडवा ; कृषीमंत्र्यांना पत्र..

सध्या पीक विम्याबाबत एका जिल्ह्यात हा प्रश्न समोर आला आहे, तसाच तो राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही असू शकतो याकडेही अंबादास दानवे यांनी कृषिमंत्री सत्तार यांचे लक्ष वेधले. (Ambadas Danve)
Opposition Leader Danve Letter to Minister Sattar News
Opposition Leader Danve Letter to Minister Sattar News Sarkarnama

औरंगाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न सोडवावा या मागणीसाठी स्थानिक शिवसेनेचे आमदार कैलास पाटील हे गेल्या ५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे कृषिमंत्री या नात्याने शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करुन शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळवून द्यावी. तसेच आमदार पाटील यांचे आमरण उपोषण सोडवावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना पत्र लिहून केली आहे.

Opposition Leader Danve Letter to Minister Sattar News
Marathwada : सत्तारांच्या सत्तेची नशा सरकारला अडचणीत आणणार ?

सध्या पीक विम्याबाबत एका जिल्ह्यात हा प्रश्न समोर आला आहे, तसाच तो राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही असू शकतो याकडेही अंबादास दानवे यांनी कृषिमंत्री सत्तार (Abdul Sattar) यांचे लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देवून देखील पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे द्यायला तयार नाहीत, या व इतर मागण्यासाठी आमदार कैलास पाटील (Kailas Ghadge Patil) हे ऐनदिवाळीत आमरण उपोषणाला बसले आहेत.

त्यांच्या आंदोलनाला जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था, संघटना आणि शेतकऱ्यांचा पाठिंबा देखील मिळत आहे. उपोषणाला पाच दिवस उलटून गेले असले तरी सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. पाटील यांची प्रकृती देखील खालावली आहे.

या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी कृषीमंत्र्यांना पत्र लिहून आमदार पाटील यांचे उपोषण सोडवावे, अशी मागणी करतांनाच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळवून द्यावा, अशा आशयाचे पत्र पाठवले आहे.

संबंधित बजाज अलायंस या पीक विमा इन्शुरन्स कंपनीसह सर्व पीक विम्या कंपन्यांना राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा भरपाई देण्यासाठी आदेश देण्यात यावे, अशी मागणीही दानवे यांनी कृषिमंत्री सत्तार यांच्याकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in