Marathwada : `राज्यपाल हटाव`साठी सहकार मंत्र्यांच्या घरासमोर ढोल वाजवून आंदोलन

Governor : सावे यांनी शिवभक्तांच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्यात येतील, असे आश्वासन दिले.
Protest In Front Of  Ministers House News, Aurangabad
Protest In Front Of Ministers House News, AurangabadSarkarnama

Governor Koshyari News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे विद्यापीठातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करत अवमान केला होता. Governor या विरोधात राज्यभरात आंदोलने झाली, कोश्यारी यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांचे फोटो जाळण्यात आले. Maharashtra

Protest In Front Of  Ministers House News, Aurangabad
Shivsena : खैरे म्हणतात, पाच आमदारांनी गद्दारी केल्यापासून माझ्यावर कामाचा लोड..

राज्यापालांच्या विरोधात असलेला सर्वसामान्यांमधील राग अजूनही शांत झालेला नाही. औरंगाबादेत आज शिवप्रेमींच्या वतीने राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव अशा घोषणा देत सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्या घरासमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अवमानाचा तीव्र निषेध करण्यासाठी शेकडो शिवप्रेमींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

शहानुर मिया दर्गा येथील सावे यांच्या निवासस्थानासमोर ढोल वाजवून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. मराठी अस्मितेचा अवमान करणाऱ्या महाराष्ट्र द्वेषी राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात असूनही अतुल सावे यांनी राज्यपालांचा स्पष्ट आणि थेट निषेध केला नाही याबद्दल देखील शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

छत्रपती शिवरायांचा अवमान महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही असा इशारा मंत्री सावे यांच्या घरासमोर आंदोलन करून देण्यात आला. सावे यांनी शिवभक्तांच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्यात येतील, असे आश्वासन आंदोलकांना दिले.

`राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव´या मागणीसाठी आंदोलन सप्ताह पाळण्याचा निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यात यावी आणि राज्यपालांना पाठीशी घालणाऱ्यां नेत्यांना जाब विचारण्यात यावा यासाठी अधिक आक्रमकपणे आंदोलन करण्याचा निर्धार देखील यावेळी व्यक्त करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com