Marathwada : पाणंद रस्त्यांची कामे डिसेंबर अखेर पुर्ण करा, अन्यथा कारवाई..

Guardian Minister : रोहयोच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर डिसेंबरनंतर कारवाई करण्यात येणार
Guardian Minister Sandipan Bhumre News, Aurangabad
Guardian Minister Sandipan Bhumre News, AurangabadSarkarnama

Sandipan Bhumre News : रोजगार हमी योजनेतील मंजूर कामे डिसेंबर अखेर सुरु करुन विभागाने दिलेले उदिष्ट प्रत्येक जिल्हयांनी पूर्ण करण्याचे निर्देश Guardian Minister पालकमंत्री तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज विभागीय आढावा बैठकीत दिले. आठही जिल्ह्यातील रोहयोचे उपजिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Guardian Minister Sandipan Bhumre News, Aurangabad
Osmanabad : महापुरुषांच्या अपमानाचा भाजपकडून ठरवून करेक्ट कार्यक्रम..

मातोश्री पाणंद रस्त्याची कामे पूर्ण करुन ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ता उपलब्ध करुन द्यावा. (Aurangabad) विशेषत: जालना जिल्ह्यतील अबंड व घनसावंगी या तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतरस्त्यासाठी वारंवार मागणी केलेली असून ही मागणी पूर्ण करण्यासाठी गटविकास अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनी कालबद्ध कार्यक्रम आखून शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करुन द्यावेत. (Marathwada) अन्यथा डिसेंबरनंतर कारवाई करण्याचे निर्देश भुमरे यांनी दिले.

औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली व नांदेड या जिल्ह्याने शासनाने दिलेला रोहयोच्या योजनेतील कुशल व अकुशल कामांचा निधी खर्च करुन तात्काळ उर्वरित कामे पूर्ण करावेत. यामध्ये सामूहिक, वैयक्तिक विहीर, शोष खड्डे, पानंद रस्ते, वृक्ष लागवड, घरकूल बांधणी या कामाचा संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील तालुकानिहाय आढावा बैठकीत घेण्यात आला.

सचिव नंदकुमार यांनी शेतकऱ्यांना व गरीब दुर्बलांना यातून बाहेर काढण्यासाठी व त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी रोजगार हमी योजना राज्यात राबविले जात असून यामध्ये उपजिविकेसोबत शिक्षण, आरोग्य, राहणीमान व आर्थिक प्रगती यासाठी रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणेने प्रमाणिक पणे पार पाडावी, असे आवाहन केले.

रोहयोच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर डिसेंबरनंतर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत रोजगार हमी योजना विभागाचे सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, उपायुक्त रोहयो समिक्षा चंद्राकार, व गटविकास अधिकारी यांची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com