Marathwada: गोगलगायीमुळे झालेल्या पिक नुकसानीसाठी तीन जिल्ह्यांना ९८ कोटींची मदत..

सर्वाधिक नुकसान लातूर जिल्ह्यात ६८ हजार ३८५ हेक्टर, बीडमध्ये ३ हजार ८२२ तर उस्मानाबादमध्ये २८३ हेक्टरवरील पिकांवर याचा परिणाम झाला होता. ( Cm Eknath Shinde)
Cm Eknath Shinde News Mumbai
Cm Eknath Shinde News MumbaiSarkarnama

औरंगाबाद : शंखी गोगलगायीमुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या (Farmers) शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी केली जात होती. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली होती. परंतु शंखी गोगलगायीमुळे (Crop) पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा यात समावेश नव्हता.

अखेर मराठवाड्यातील बीड, लातूर आणि उस्मानाबाद तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने ९८ कोटी ५८ लाखांची मदत जाहीर केली आहे. (Marathwada) लातूर, उस्मानाबाद, बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे सोयाबीन शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या संदर्मुभात आमदार धनंजय मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, नमिता मुंदडा यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात मदतीचे निर्देश दिले होते. त्यानुसार या तीन जिल्ह्यांना ९८ कोटी ५८ लाख रुपये निधी देण्यात आला आहे.

Cm Eknath Shinde News Mumbai
वेदांता प्रकल्प जाण्याला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार ; दानवेंनी हात झटकले..

याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आले आहेत. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमधील ७४ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. १ लाख १८ हजार ९९६ शेतकऱ्यांना शंखी गोगलगायींचा फटका बसला होता. सर्वाधिक नुकसान लातूर जिल्ह्यात ६८ हजार ३८५ हेक्टर, बीडमध्ये ३ हजार ८२२ तर उस्मानाबादमध्ये २८३ हेक्टरवरील पिकांवर याचा परिणाम झाला होता.

जून ते आॅगस्ट दरम्यान गोगलगायींचा प्रादुर्भाव बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वाढला होता. या शिवाय सततच्या पावसामुळे ४ लाख ३९ हजार ६२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना सततचा पाऊस आणि गोगलगायीमुळे झालेले नुकसान असा दुहेरी फटका बसला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com