Protest For Maratha Reservation : मराठा व कुणबी एकच, त्यांचा इतर मागास वर्गात समावेश करा ; ठिय्या आंदोलन सुरू..

Maratha Reservation : मराठा समाज हा शतकानुशतके शेतीची मशागत करत आला आहे. यावरच कुणबी आपला उदरनिर्वाह करीत आहेत.
Protest For Maratha Reservation
Protest For Maratha Reservation Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : मराठा समाजाला आरक्षण (Protest For Maratha Reservation) मिळावे यासाठी तीन दशकांपासून अनेक आंदोलन करण्यात येत आहेत. यात अनेक मराठा बांधव शहीद झाले, तर अख्खी एक पिढीच यात बरबाद झाली आहे. मराठा आणि कुणबी एकच असून त्यांचा इतर मागासवर्गात सरसकट समावेश करावा, या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे क्रांती चौकात महाराष्ट्र दिनापासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.

Protest For Maratha Reservation
Paithan APMC Result News : पैठण भुमरेंचेच, सर्व १८ जागा जिंकल्या, आघाडी फेल..

आता नाही तर कधीच नाही म्हणून अशी, भूमिका घेत इतर मागासवर्गात सरसकट समावेश होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे पाटील आदींनी दिला. (Aurangabad) क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सकल मराठा समाजातर्फे मराठा आणि कुणबीच्या (Maratha Reservation) आरक्षणासंदर्भात सकल मराठा समाज व सर्व समविचारी मराठा संघटनातर्फे हे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.

मराठा समाज हा शतकानुशतके शेतीची मशागत करत आला आहे. यावरच कुणबी आपला उदरनिर्वाह करीत आहेत. बोटावर मोजता येईल, इतकाच मराठा समाज जमीनदार आहे. (Marathwada) आज ५० टक्के मराठा भूमीहीन असून मजूरी शेतमजुरीचे काम करत आहे. मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचे अनेक पुरावे आम्ही सरकारला आजपर्यंत दिले आहेत. खत्री, बापट, सराफ आयोग, भाटिया समिती, गायकवाड आयोग या सर्वांच्या समोर तोंडी व लेखी स्वरूपात याची पुरावे सादर केले आहेत.

तरीही समाजाच्या बाजूने कोणीही सकारात्मक निर्णय घेतलेला नाह, अशी खंतही ठिय्या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. आमची मागणी मान्य करा अन्यथा ओबीसीतील सरसकट जातीनिहाय जनगणना करावी,अशी आमची मागणी आहे. मराठा हा शब्द जातिवाचक नसून तो समूहवाचक, धर्म उपाधी वाचक आहे. जसे १९७० व ८० च्या दशकापर्यंत शाळेत सर्वांच्या नोंदी मराठा- तेली, मराठा- कुणबी, मराठा- माळी, मराठा- धनगर ,मराठा -न्हावी, मराठा- लोहार अशी असायची.

सरकारने जात धर्मावर नव्हे तर त्यांच्या व्यवसायावरून ज्यांना त्यांना आरक्षण दिले आहे. त्यामध्ये बहुसंख्य म्हणून काही प्रमाणात मराठ्यांना जमीनदार म्हणून डावलले गेले. आजही मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील चार पाच जिल्हे सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात मराठा समाजाला मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा एकच असल्याचे ओबीसी व इतर मागासवर्गीय प्रमाणपत्र देण्यात येते.

Protest For Maratha Reservation
Gangapur APMC Result News : भाजप आमदार बंब यांनी मतदारसंघातील दोन्ही बाजार समित्या जिंकल्या..

त्याचा लाभही ते लोक घेत आहेत याचा संदर्भ घेत तत्कालीन महाराष्ट्र सरकारने एक जून २००४ रोजी अध्यादेश काढून मराठा कुणबी समकक्ष असल्याचे व शेतीच्या खासरा उतारा, जन्म मृत्यू नोंदणीचे पुरावे सादर करून ८३ वे ओबीसी प्रमाणपत्र दिले. तेच प्रमाणपत्र उर्वरित सर्वांना त्वरित द्यावेत, मराठा आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून करीत असल्यामुळे केंद्र सरकारने याची दखल घेऊन १४ नोव्हेंबर १९९९ ला सरकारने न्यायमूर्ती श्यामसुंदर यांचा राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पाठवला होता.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी व इतर मागासवर्गात समावेशासाठी मुंबई मंत्रालयामध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाला आपल्याकडे असणारी कागदपत्र पुरावे सादर करण्यासाठी बोलवण्यात आले. तेव्हा आम्ही स्वतः मुंबईत हजर राहून लेखी पुरावे सादर केले होते, असेही भराट यांनी सांगितले.

आंदोलनात सतीश वेताळ, रेखाताई वाहाटुळे ,मच्छिंद्र बोर्डे, सुरेश गायकवाड, शैलेश भिसे, मनीषा मराठे, अजय गंडे ,दिव्या पाटील, राजेश लांडगे, सुनील खरात, शुभम भराट, प्रसाद भागीते, राजू बराडे, शिरीष गायकवाड, कविता पाटील, कल्याण हारदे, विजय घोगरे, अवधूत शिंदे, विजय काकडे ,विकी राजे ,सुवर्णा मोहिते ,संदीप जाधव, किरण काळे ,समाधान येडे ,विकास पाटील यांच्यासह असंख्य मराठा समाजातील कार्यकर्ते तरुण महिला यांनी सहभाग नोंदवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com