
Jalna News : अंतरवाली सराटी येथे काल मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला, प्लास्टीक बुलेट, छऱ्यांचा मारा केला. (Marathwada Political News) यात अनेकजण गंभीर जखमी झाले आणि त्याचे तीव्र पडसाद आज मराठवाड्यासह राज्यात उमटले. आंदोलकांची भेट घेऊन त्यांची चौकशी करण्यासाठी अंतवाली सराटीत आज राजकीय नेत्यांची मोठी गर्दी झाली होती.
अगदी सत्ताधारी आणि विरोध पक्षाच्या नेत्यांनीही इथे हजेरी लावत आंदोलकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. (Maratha Reservation) अगदी पहाटेपासून अंतरवाली सराटीत राजकीय नेते, खासदार, आमदार, लोकप्रतिनीधींची ये-जा सुरू होती. (Jalna) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी शनिवारी पहाटे अडीच वाजता उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या घरी भेट दिली.
तर त्यापाठोपाठ आज सकाळी संभाजीराजे छत्रपती यांनी सकाळी दहाच्या सुमारास आंदोलनस्थळी भेट दिली. (Marathwada) छत्रपती उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकामागोमाग आंदोलनस्थळी भेट दिली. एकाचवेळी या दोघांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
माजी मंत्री जयंत पाटील, राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, विनोद पाटील यांनीही आंदोलनस्थळी भेट देत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. दुपारनंतर सत्ताधारी केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांनी आंदोलनस्थळी भेट घेत चर्चा केली.
केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी साडेचार वाजता भेट दिली. आंदोलकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न या मंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहित देत केला. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील साडेआठ वाजता आंदोलनस्थळी पोहचत आहेत.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.