Sholay Style Andolan: मराठा आरक्षणासाठी तरुणाचे "शोले स्टाइल" आंदोलन; मुख्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

Maratha Reservation News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज सतरावा दिवस आहे.
Maratha Reservation News
Maratha Reservation News Sarkarnama

Beed Andolan News: मराठा आरक्षणासह वाहिरा गावातील रस्ता आणि विविध मागण्यांसाठी एका युवकाने दोन दिवसांपासून शोले स्टाइल आंदोलन सुरू केले आहे. अशोक माने असे त्याचे नाव आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे माने याने रात्रीदेखील आंदोलन सुरूच ठेवले.

अशोक माने याने मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. वर्षभरापासून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांना दिले आहे. तरीही त्याची दखल न घेतल्यामुळे त्याने आंदोलन सुरू केले आहे. गावकऱ्यांनी त्याला आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे, प्रशासनाने त्याच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे.

माझे काही झाले तर त्याला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असतील, असा इशारा त्याने दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज सतरावा दिवस आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी मान्य झालेली नाही. त्यासाठी सरकारला एक महिना देण्यास जरांगे तयार आहेत. लेखी हमी घेतल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Maratha Reservation News
Omraje Nimbalkar News : 'हे' ट्रिपल इंजिनचे सरकार बघा, मराठा आरक्षण किती गांभीर्याने घेतंय; ‘त्या’ व्हिडिओवरून ओमराजे संतापले...

“मराठा पेठून उठलेला आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही”, असा इशारा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची मुलगीही पल्लवी जरांगे पाटील हिने मराठा मोर्चातून राज्य सरकारला इशारा दिला आहे. पल्लवी ही बुलडाण्याच्या मोर्चात सहभागी झाली होती.

Edited By : Mangesh Mahale

Maratha Reservation News
Eknath Khadse News : एकनाथ खडसेंचा मतदारसंघ ठरला; रावेरमधून सुने विरोधात मैदानात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in