
Governor News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध सप्ताह पाळला जात आहे.
याअंतर्गत मंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाव आंदोलन केल्यानंतर आता राज्यपालांच्या राजीनाम्यासाठी कचरा गाडी आली, कचरा हटाव म्हणत शिवप्रेमींनी शिट्टी बजाव आंदोलन केले. (Marathwada) छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त विधान आणि अवमान करणाऱ्या राज्यपालांना (Bhagat Singh Koshyari) सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून केला जातोय.
त्यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू असताना देखील त्याची दखल केंद्राकडून घेतली जात नाही. या विरोधात संतप्त शिवप्रेमींनी मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली निषेध सप्ताह पाळण्याचे ठरवले होते.
त्यानुसार सहकार मंत्री अतुल सावे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर ढोल वाजवून शिवप्रेमींच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर काल राज्यपाल हटावच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिट्टी बजाव आंदोलन करण्यात आले.
यावेळी कचरा गाडी आली, कचरा हटाव अशा घोषणा देत आंदोलकांनी राज्यपालांचा निषेध नोंदवला. राज्यपालांच्याविरोधातील रोष काही केल्या कमी होतांना दिसत नसून त्यांना माघारी पाठवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.