काँग्रेसने दिला मित्रपक्ष राष्ट्रवादीसह भाजपलाही दणका; देशमुखांच्या वर्चस्वाला बळ

Congress | NCP | BJP : भाजपमुक्तीचा लातूर पॅटर्न कानाकोपऱ्यात पोहचवा
Nana Patole - Amit Deshmukh Congress
Nana Patole - Amit Deshmukh CongressSarkarnama

लातूर : काँग्रेसने (Congress) परभणीपाठोपाठ लातूर जिल्ह्यात देखील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) धक्का दिला असून त्यात भाजपला देखील दणका बसला आहे. लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना भाजपमुक्तीचा हा लातूर पॅटर्न मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा असे आवाहन पटोले यांनी केले.

नाना पटोले पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने सत्तेत येताना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सत्तेत आल्यापासून भाजपाने संविधान संपवण्याचे काम सुरु केले आहे. तर महाराष्ट्राला बदनाम करण्याचे पापही केले जात आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान केला जात आहे. भाजपाला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असून आज लातूरमधून भाजपमुक्तीची सुरुवात झाली आहे. आता हे वातावरण मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा, असेही आवाहन त्यांनी केला.

Nana Patole - Amit Deshmukh Congress
Disha Salian Case:राणे पिता-पुत्राला १० मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश

यावेळी लातूरचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, आमदार राजेश राठोड, धीरज देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमित देशमुख यांनी या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर बोलताना आगामी काळात लातूरमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकवणारच असा आशावाद व्यक्त केला. लातूर जिल्ह्यातील या मोठ्या संख्येने झालेल्या पक्षप्रवेशांमुळे देशमुख यांच्या वर्चस्वाला आणखी बळ आले असल्याची चर्चा होत आहे.

Nana Patole - Amit Deshmukh Congress
पुतीन यांचा काटा तुम्हीच काढा! अमेरिकेच्या खासदाराचं जाहीर आवाहन

आज कोणकोणत्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला?

आज लातूर जिल्ह्यातील निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, निलंग्याचे माजी नगराध्यक्ष हमिद इब्राहिम शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चक्रधर शेळके, पंचायत समिती सदस्य रमेश सोनावणे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वाती विक्रम जाधव, निलंगा तालुका भाजपाचे माजी शहराध्यक्ष संजय सुभेदार, निलंगा येथील ज्येष्ठ भाजपा नेते आबासाहेब गोविंदराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलंगा विलास विनायक लोभे, अनुसुचित मोर्चा लातूरचे जिल्हाध्यक्ष अनिता सुधाकर रसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद मुळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com