Bharat Rashtra Kisan Samithi (BRS) : भारत राष्ट्र किसान समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी माणिक कदम

Maharashtra Politics : 'बीआरएस'च्या देशातील विस्ताराची सुरुवात महाराष्ट्रातून
Manik Kadamm K Chandrashekhar Rao
Manik Kadamm K Chandrashekhar RaoSarkarnama

Maharashtra BRS : भारत राष्ट्र किसान समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी माणिक कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या स्वाक्षरीनिशी माणिक कदम यांना आज नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

माणिक कदम (Manik Kadam) हे गेल्या २५ वर्षांपासून शेतकऱ्यांशी संबंधित कार्यात आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी नेते शरद जोशी (Sharad Joshi) तसेच राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या समवेत त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला होता. माणिक कदम हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गेली अनेक वर्ष सक्रिय होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडले. दरम्यान, २०१४ पासून माणिक कदम यांनी 'मी शेतकरी, आत्महत्या करणार नाही' हा उपक्रम राबवित आहेत.

Manik Kadamm K Chandrashekhar Rao
Ajit Pawar : "शिवसेना पक्ष-चिन्हाबाबत आयोगाचा निर्णय पक्षपाती असल्याची जनभावना!"

त्या उपक्रमातून कदम यांनी शेकडो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन दिलासा देत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी कार्य केले आहे. त्यांच्या शेतकऱ्यांविषयी कार्याची नोंद घेऊन बीआरएस (BRS) पक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी माणिक कदम यांची भारत राष्ट्र किसान समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

Manik Kadamm K Chandrashekhar Rao
Pune by poll election : दुपारी तीन वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 30.55 तर कसब्यात 30 टक्के मतदान

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या पक्षविस्ताराची सुरूवात महाराष्ट्र राज्यातून झाली आहे. त्यामुळे माणिक कदम यांची निवड देशात महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

या नियुक्तीनंतर माणिक कदम (Manik Kadam) म्हणाले की, "महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याविषयी लवकरच कार्याला सुरूवात करण्यात येईल."

Manik Kadamm K Chandrashekhar Rao
Kasaba By-Election : भाजप उमेदवार अडचणीत;आचारसंहितेचा भंग, कारवाई होणार?

तेलंगणचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे. यामुळे त्यांनी देशातील विविध राज्यांत आपल्या पक्षाचा प्रवेश करतानाच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस विरहीत आघाडीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नांदेडमध्ये ५ फेब्रवारी रोजी जाहीर सभा घेतली होती. त्यास प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी राव यांनी 'अब की बार किसान सरकार' असा नारा दिला होता.

चंद्रशेखर राव यांनी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यात राव यांनी आपला मोर्चा महाराष्ट्रातही पक्ष वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, राव यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करा, अशी विनंती केली होती. मात्र त्यांची ऑफर राजू शेट्टी यांनी नम्रपणे नाकारली होती.

Manik Kadamm K Chandrashekhar Rao
By Election : चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीत आतापर्यंत काय-काय घडलं? दोन गटात हाणामारी ते...

राजू शेट्टी म्हणाले होते, "आम्हाला आमची संघटना संपवायची नाही. मी करिअर करण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यावर लढा देण्यासाठी काम करतो." त्यांच्या नकारानंतर चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील नेतृत्व शेतकरी चळवळीत काम करणारे माणिक कदम यांच्याकडे सोपविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com