मंत्रीमंडळ विस्तार होईपर्यंत मला शिक्षणमंत्री करा : राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना पत्र..

Eknath Shinde सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याने असेही पत्र
Cm Eknath Shinde-Koshyari News Aurangabad
Cm Eknath Shinde-Koshyari News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : राज्यातील ठाकरे सरकार पायउतार झाले, शिंदे-फडणवीस मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री झाले. स्वागत, हारतुरे कौतुक सोहळाही सुरू आहे. पण महिना उलटला तरी राज्याला मंत्रीमंडळ मिळू शकलेले नाही. (Aurangabad) संपुर्ण राज्याचा कारभार दोघेच पाहत आहेत. राज्यातील काही भागात पूर परिस्थीती आहे, शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होऊन प्रचंड नुकसान झाले. पण पालकमंत्री, कृषीमंत्री व इतर कोणाचाच अजून शपथविधी झालेला नाही. त्यामुळे राज्याला मंत्रीमंडळ कधी मिळणार अशी चर्चा रोज सुरु आहे.

राजकीय नेते, पक्षांकडून तर ती सुरूच आहे, पण आता सामान्य लोकही हा प्रश्न विचारू लागले आहेत. मंत्र्यांअभावी शिक्षण क्षेत्राचे नुकसान होत असल्याचा आरोप करत जालन्याच्या एका तरुणाने तर थेट मंत्रीमंडळ विस्तार होईपर्यंत मलाच शिक्षणमंत्री करा, अशा मागणीचे निवेदनच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Shingh Koshyari) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठवले आहे.

३० जून २०२२ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तेंव्हापासून आत्तापर्यंत केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हेच राज्याचा कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे सहाजिकच कामकाज ठप्प झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे, तातडीची मदत, पुरग्रस्तांचे झालेले नुकसान यावर देखील निर्णय घेतले जात नाहीये. अशीच अवस्था शिक्षण, कृषी व इतर विभागांची देखील आहे.

त्यामुळे मंत्रीमंडळ गठीत होईपर्यंत शालेय शिक्षणमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार आपल्याकडे द्यावा, अशी मागणी संतोष मगर या तरुणाने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शालेय शिक्षण विभाग हा एक महत्वाचा विभाग आहे. या विभागाच्या समस्या अत्यंत जटील व मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच या विभागाअंतर्गत येणाऱ्या अनेक समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत. २०१७ पासूनची शिक्षक भरती अजून देखील पूर्ण झालेली नाही.

Cm Eknath Shinde-Koshyari News Aurangabad
राष्ट्रवादीचे दोन मंत्री आधीच जेलमध्ये, तिथेही युती हवी, म्हणून संजय राऊत गेले..

५ वर्षापासून शिक्षक भरती नसल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्यात अनेक वर्षापासून विनाअनुदानित शाळा शिक्षकांचा प्रश्न सुटलेला नाही. यातच मागच्या काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याने शिक्षण विभागाच्या समस्यांमध्ये वाढ झालेली आहे. नवे सरकार आले पण या खात्याला अजून मंत्रीच मिळालेला नाही.

मग हे प्रश्न सुटणार कधी ? असा प्रश्न उपस्थितीत करत या तरूणाने मला समाजसेवेच्या भावनेतूनशालेय शिक्षणमंत्री पदाचा कार्यभार द्यावा, त्या पदावर मला काम करण्याची इच्छा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून मी शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी कम करत आहे. शिक्षण विभागातील समस्यांची मला जाण असल्याने त्या मंत्रीपदाला योग्य न्याय देवू शकतो. आपण एक संवेदनशील मुख्यमंत्री असल्याने माझ्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा, असेही निवदेनात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in