गॅस पाईपलाईन कार्यक्रमावर महाविकास आघाडीचा बहिष्कार; खासदारांचीही पाठ

पाणीपुरवठा योजनेला अद्यापही म्हणावा तसा वेग आलेला नसतांना भाजपने मात्र गॅस पाईपलाईनद्वारे येत्या डिसेंबरपासून घराघरात गॅस पोहचवण्याचे नियोजन केले. (Bjp, Aurangabad)
Karad-Bhumre-Sattar-Imtiaz Jaleel
Karad-Bhumre-Sattar-Imtiaz JaleelSarkarnama

औरंगाबाद : भारत पेट्रोलियम आणि केंद्रीय पेट्रोलियम विभागाच्या वतीने औरंगाबाद-अहमदनगरमध्ये होणाऱ्या पीएनजी गॅस पाईपलाईन कामाचे भुमीपूजन आज औरंगाबादेत पार पडले. (Bjp) शंभरहून अधिक सीएनजी स्टेशन आणि सात लाख नागरीकांना पाईपद्वारे गॅस पोहचवण्याचा चार हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. (Aurangabad) राज्यसभेचे खासदार तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प या दोन जिल्ह्यात होत आहे.

या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मंत्री, खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु शिवसेना-राष्ट्रवादी-काॅंग्रेस या महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे दिसून आले. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील निमंत्रण पत्रिकेत नाव असून कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे या संपुर्ण कार्यक्रमावर भाजपचीच छाप दिसून आली.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून मास्टरस्ट्रोक लगावल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. गेली पंचवीस वर्ष महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला ५५ किलोमीटरवर असलेल्या जायकवाडी धरणातून पाणी आणता आले नाही, त्यामुळे नागरिकांना आठ दिवसाला पाणी मिळते, भाजपने मात्र केंद्रात मंत्री पदाच्या माध्यमातून संधी मिळताच गॅस पाईपलाईन प्रकल्पाच्या माध्यमातून शिवसेनेवर कुरघोडी केल्याचे बोलले जाते.

कार्यकमाच्या भुमीपूजन प्रसंगी भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या भाषणातील सूर देखील असाच काहीसा होता. शहराच्या विकासात राजकारण आणू नका असे आवाहन करत भाजपने जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मंत्र्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते, मात्र ते कुणीही स्वीकारले नाही. खासदार इम्तियाज जलील यांनी आधीच या प्रकल्पा बद्दलची आपली भूमिका स्पष्ट करत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंह पुरी यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता.

शहरवासियांना आधी पाणी द्या, त्याची गरज असतांना गॅसचा प्रकल्प आणि त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले सिमेंटचे रस्ते खोदले जातील, असा आरोप करत इम्तियाज जलील यांनी आपला विरोध दर्शवला होता. त्यामुळे त्यांनी देखील या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. भाजपने मात्र केंद्रीय मंत्र्यांचा दौरा रद्द झाल्यानंतर देखील प्रकल्पाचे भुमीपूजन थाटात केले. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Karad-Bhumre-Sattar-Imtiaz Jaleel
Beed : ही दोस्ती तुटायची नाय, ३६ वर्षांपासूनची मैत्री, राजकीय वाटचालही सारखीच..

पाणीपुरवठा योजनेला अद्यापही म्हणावा तसा वेग आलेला नसतांना भाजपने मात्र गॅस पाईपलाईनद्वारे येत्या डिसेंबरपासून घराघरात गॅस पोहचवण्याचे नियोजन केले. त्यामुळे सहाजिकच दोन पक्षामधील कार्यपद्धतीची तुलना या निमित्ताने होऊ लागली आहे. तुर्तास भाजपने या गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून मास्टरस्ट्रोक लगावला, असेच म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com