लातूरमध्ये महाविकास आघाडीला यश; काँग्रेसला सर्वाधिक जागा

विकासाची साखळी मजबूत करून मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. महाविकास आघाडी सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळेल. (Guardian Minister Amit Deshmukh)
Amit Deshmukh
Amit DeshmukhSarkarnama

लातूर : लातूर जिल्ह्यातील चाकूर, देवणी, शिरूर अनंतपाळ व जळकोट नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. (Congress) यामध्ये महाविकास आघाडीला निर्विवाद विजय मिळाला असून, काँग्रेसला सर्वाधिक २३ जागा मिळाल्या आहेत. (Latur) राष्ट्रवादी काँग्रेस १४, तर शिवसेनेला ६ जागांवर विजय मिळवता आला. (Amit Deshmukh)

या निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीला जिल्ह्यात कौल दिल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून पालकमंत्री देशमुख यांनी नगरपंचायत निवडणुकीचे नेतृत्व केले होते.

चाकूर, देवणी, शिरूरअनंतपाळ व जळकोट येथे महाविकास आघाडी उमेदवारांसाठी त्यांनी प्रचार सभाही घेतल्या. या सभेच्या माध्यमातून विकासाला गती देण्यासाठी, मूलभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी संधी देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले होते.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेली विकासकामे मतदारांसमोर ठेवत त्यांनी याच मुद्यावर प्रचारात जोर दिला होता. मतदारांनी जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत विकासासाठी महाविकास आघाडीला कौल देऊन मतदान केल्याचेही देशमुख म्हणाले.

Amit Deshmukh
टोपेंच्या घनसावंगीत राष्ट्रवादीची सत्ता, मंठ्यात शिवसेनेचा भगवा फडकला

या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक २३ जागा मिळाल्या. देवणी नगरपंचायतीमध्ये एकहाती सत्ता आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १४ जागा मिळाल्या असून, शिवसेना ६ जागेवर विजयी झाली आहे.

या पुढील काळात स्थानिक पातळीवर विकासाची साखळी मजबूत करून मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. महाविकास आघाडी सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाहीही देखील देशमुख यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com