महाविकास आघाडी सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज

(Bjp Leader Ashish Shelar)या पोटनिवडणूकीनंतर राज्यात सत्तांतर होणार (Deglur-Biloli By Election) असल्याचा दावा भाजपने केला आहे.
महाविकास आघाडी सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज
Bjp Mla Ashish Shelar And Cm Uddhav ThackeraySarkarnama

नांदेड ः देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा अक्षरशः धुराळा उडवला जात आहे. शिवसेनेतून भाजपमध्य प्रवेश केलेले माजी आमदार सुभाष साबणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार आशिष शेलार आज देगूलरमध्ये आले होते.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असल्याची टीका केली. हे सरकार दलालांचे असल्याचा आरोपही शेलार यांनी केला. काॅंग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणूकीत काॅंग्रेसने जितेश अंतापूरकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली.

काॅंग्रेसने प्रचाराला सुरूवात केल्यानंतर आज भाजपने सुभाष साबणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खुंबा, आमदार आशिष शेलार, माजी मंत्री बबनराव लोणीकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

दानवे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्यावर आशिष शेलार यांनीही महाविकास आघाडी सरकारवर गंभीर टीका केली. हे सरकार दलालांनी चालवलेलं सरकार आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे तीनही पक्ष व त्यांचे महाविकास आघाडी सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असल्याचा आरोप शेलार यांनी केला.

Bjp Mla Ashish Shelar And Cm Uddhav Thackeray
अडीच वर्षात मुख्यमंत्री मंत्रालयात पोहचू शकले नाहीत, ते शेतकऱ्याच्या बांधावर काय जाणार?

तर याच प्रचार सभेत माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी या पोटनिवडणूकीनंतर राज्यात सत्तांतर होणार असल्याचा दावा करत शिवसेनेचे बारा आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in