Maharashtra Politics : "...म्हणून शिंदेंसोबत गेलेले कैलास पाटील गुजरात बोर्डरहून परत आले!''

Marathwada Graduate Election : राष्ट्रवादीच्या आमदाराचा गौप्यस्फोट, कैलास पाटील अडचणीत...
Ncp Mla Vikram Kale
Ncp Mla Vikram Kale Sarkarnama

Ncp Mla Vikram Kale on Mla Kailas Patil : मागील वर्षी जून महिन्यात उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी बंडखोर आमदारांना थेट सुरतला हलविण्यात आलं होतं. यावेळी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील हेही आमदारांसोबत होते. पण त्यांची गाडी महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळ पोहचली होती. दिशाभूल झाल्याचं लक्षात आल्यावर आपण निसटलो असा दावा पाटील यांनी त्यावेळी केला होता. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे (Vikram Kale) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी शिक्षक मेळाव्याचं आय़ोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केलं. या कार्यक्रमाला उस्मानाबादचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील हे उपस्थित होते. काळे म्हणाले, राज्यातील सत्तांतरावेळी कैलास पाटील हे शिंदे गटासोबत होते. मात्र, ओमराजे निंबाळकर यांच्या फोनमुळेच कैलास पाटील (Kailas Patil) हे गुजरात बॉर्डरवरून परत आले असा गौप्यस्फोट विक्रम काळे यांनी केला आहे. यामुळे कैलास पाटील हे चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Ncp Mla Vikram Kale
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचं व्हिडीओ ट्वीट चर्चेत ; लेकीच्या 'त्या' प्रश्नावर लयभारी उत्तर देत जिंकलं मन

तसेच यावेळी ओमराजे निंबाळकर म्हणाले, शिवसेनेमध्ये होणाऱ्या बंडाची कुणकुण आम्हाला पूर्वीपासून होती, हालचाली दिसत होत्या, असा दावा ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेनेतील बंडाची कुणकुण होती. मात्र आम्ही सत्तेसाठी गद्दारी केली नाही. सत्ता गेली तरी संघर्ष करायचा असं आमचं आणि कैलास पाटील यांचं ठरलं होतं. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळं पद मिळालं सन्मान मिळाला असंही ओमराजे (Omraje Nimbalkar) यावेळी म्हणाले.

Ncp Mla Vikram Kale
Satara News : शिवेंद्रसिंहराजेंचा आघाडीवर हल्लाबोल ; म्हणाले, "भ्रष्टाचाराचा उगम..

लघुशंकेच्या बहाण्यानं गाडीतून उतरले आणि निसटले...

विधान परिषद निवडणूक संपल्यानंतर उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांच्यासह काही आमदारांना गाडीत बसवण्यात आलं .'एकनाथ शिंदे भेटणार आहेत, चर्चा करणार आहेत,' असं सांगत विधिमंडळातून त्यांना नेण्यात आलं आणि प्रवास सुरू झाला. दोन ते तीन तास झाले तरी एकनाथ शिंदे यांच्याशी काही भेट झाली नाही म्हणून कैलास पाटील यांना शंका आली. गाडीत बसवून आपल्याला नेमकं कुठे घेऊन चालले आहेत? असा प्रश्न त्यांना पडला.तोपर्यंत गाडी महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळ पोहचली होती.

आपली दिशाभूल झालीय, हे तोपर्यंत कैलास पाटील यांना कळून चुकलं होतं. लघुशंकेसाठी गाडी थांबवा, असं त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं. गाडीतून खाली उतरताच अंधाराचा फायदा घेत कैलास पाटील तिथून निसटल्याचा दावा आमदार पाटील यांनी त्यानंतर केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com