राज ठाकरेंचे थेट लक्ष्य शिवसेनाच! डॅमेज कंट्रोलचे उद्धव ठाकरेंपुढे आव्हान

Raj Thackeray | Uddhav Thackeray | Shivsena : राज ठाकरेंची तोफ आता औरंगाबादेत धडाडणार!
Uddhav Thackeray, Raj Thackeray
Uddhav Thackeray, Raj ThackerayFile Photo

औरंगाबाद : हिंदुत्व आणि मशिदीवरील भोंग्यावरून आक्रमक झालेले, सरकारला अल्टीमेटम देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची १ मे रोजी औरंगाबादेत सभा होणार आहे. मागील काही काळापासून सभा, दौरे, पक्षीय जबाबदाऱ्यांच्या अदलाबदली या माध्यमातून राज ठाकरे चांगलेच सक्रिय झाले आहेत. या एका महिन्यात झालेल्या दोन सभांमधून त्यांनी राज्यभर चर्चेत राहण्यात यश मिळवले. मात्र या सगळ्यांमधून राज ठाकरे यांचे लक्ष्य थेट शिवसेनाच असल्याचे बोलले जात आहे.

कारण ठाकरे यांच्या या दोन्ही सभा मुंबई आणि ठाण्यामध्ये म्हणजे जिथे शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर आहे, अशा ठिकाणी झाल्या. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी शिवसेनेची मुंबई, ठाणे खालोखाल ताकद असलेल्या औरंगाबादकडे आपला मोर्चा वळविला आहे. औरंगाबादमध्ये ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेणार आहेत. त्यामुळेच राज ठाकरेंच्या या सभांचा अर्थ म्हणजे त्यांचे थेट टार्गेट शिवसेनाच असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.

मुंबई, ठाणेनंतर शिवसेनेची औरंगाबाद महापालिकेवर मागच्या अनेक वर्षांपासून निर्विवाद सत्ता आहे. याशिवाय शहरात ३ पैकी २, जिल्ह्यात ६ पैकी ४ आणि विधान परिषदेवर १ असे एकूण १० पैकी तब्बल ७ आमदार शिवसेनेचे आहेत. यासोबतच १९८९ पासून २०१९ पर्यंत केवळ १९९८ सालचा अपवाद वगळता इथून शिवसेनेचेच खासदार निवडून आले आहेत. औरंगाबादमध्ये आता महापालिका निवडणुका देखील होणार आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे वादळ थोपवणे आणि संभाव्य डॅमेज कंट्रोल रोखण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आणि उद्धव ठाकरेंपुढे असणार आहे.

ऐतिहासीक मैदानावरती घेणार सभा :

राज ठाकरे हे ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेणार आहेत, तिथे कधी काळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रेकाॅर्डब्रेक सभा झाल्या आहेत. इथेच ८ मे १९८८ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादच नाव संभाजीनगर करा ही पहिल्यांदा मागणी केली होती. याशिवाय स्वतः राज ठाकरे यांनीही आधी शिवसेनेत व नंतर मनसेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे यांनी मोठ्या गर्दीच्या सभा घेतल्या आहेत. त्यामुळे आता १ मे रोजीच्या राज ठाकरे यांच्या सभेली किती गर्दी होणार आणि या सभेत ते काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेला टार्गेट करण्याचा दुसरा मुद्दा म्हणजे हिंदूत्व

महाविकास आघाडीत सत्तेत असल्यामुळे हिंदूत्व सोडलेले नाही असं शिवसेना म्हणतं असली तरीही त्यांच्या आक्रमक हिंदूत्वावर काहीसा मवाळपणा आल्याचे चित्र आहे. ही गोष्ट लक्षात येताच राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्व स्विकारल्याचे पहायला मिळतं आहे. मागील काही काळापासून ते मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आग्रही झाले आहेत. तसेच स्वःत राज ठाकरे यांनी पुण्यात महाआरती करत हनुमान चालीसा म्हटली. याशिवाय येत्या ५ जून रोजी राज ठाकरे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत अयोद्धेला जाणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com