Eknath Shinde News : महाराष्ट्र ही संतांची भूमी, संत समाजाला दिशा देण्याचे काम करतात..

Marathwada : या भव्यदिव्य सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह देशभरातील आणि विदेशातील भक्त उपस्थित होते.
Cm Eknath Shinde News, Aurangabad
Cm Eknath Shinde News, AurangabadSarkarnama

Aurangabad : औरंगाबादजवळील बिडकीन येथे आयोजित ५६ व्या निरंकारी वार्षिक संत समागम सोहळ्यात आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हजेरी लावली. यावेळी निरांकारी माता सुदीक्षाजी महाराज आणि राजपिता रमित चांदनाजी यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आशीर्वाद घेतले. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संत समाजाला दिशा देण्याचे काम करत असतात, असे गौरवोद्दगार देखील मुख्यमंत्र्यांनी काढले.

Cm Eknath Shinde News, Aurangabad
Telangana News : मुख्यमंत्री केसीआरच्या पक्षाची चव्हाणांच्या नांदेडातून महाराष्ट्रात एन्ट्री...

निरंकारी मंडळातील साधक आपल्या गुरूंच्या शिकवणीनुसार निस्वार्थीपणे अखंड सेवाभाव जपण्याचा प्रयत्न करतात. (Aurangabad) कोरोना कालखंडात निरंकारी मंडळाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कोरोना केंद्र उभारण्यात आली होती याचा देखील मुख्यमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला. (Marathwada) निरंकारी मिशनचे साधक अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवताना दिसतात त्यातही मी कायम सहभागी होत असतो असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री सांगितले. याप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगेंद्रसिंह जुनेजा, संत निरंकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि देश प्रदेशातून आलेले ३ लाखांहून अधिक साधक उपस्थित होते. यावेळी निरांकारी माता सुदीक्षाजी महाराज आणि राजपिता रमित चांदनाजी यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आशीर्वाद घेतले.

औरंगाबादेत पहिल्यांदाच २७ ते २९ जानेवारीदरम्यान या आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आज समारोपाला मुख्यमंत्री उपस्थित होते. बिडकीन डीएमआयसीतील तीनशे एकर जागेवर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी तीन लाख चौरस फुटांचा सभामंडप देखील उभारण्यात आला होता.

या भव्यदिव्य सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह देशभरातील आणि विदेशातील भक्त उपस्थित होते. राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी या भव्य सोहळ्यास भेट देऊन, सुदीक्षा माताजींचे पूजन केले होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील संतांचे आशिर्वाद घेतले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com